

लंडन : उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पाण्यातील फरक आपण नेहमीच अनुभवत असतो. उन्हाळ्यात नदी, तलावातील पाणी थंड असते आणि हिवाळ्यात तेच पाणी कोमट असते. परिसरातील तापमानाच्या अगदी उलट पाण्याचे तापमान का असते, असा प्रश्न येथे उपस्थित होतो.
हिवाळ्यात भलेही तापमान कितीही कमी आणि हिमवर्षाव होत असला तरी त्या भागातील पाणी साधारण कोमटच असते, तर उन्हाळ्यात भलेही तापमान 45 अंश सेल्सिअस असले तरी त्या परीसरातील नदी, तलावांचे पाणी थंड असते. शास्त्रज्ञांच्या मते, पाण्यात गरम न होता अधिकाधिक तापमान सहन करण्याची क्षमता असते. जर नदी व तलाव अशा पाणवठ्यातील पाणी गरम व्हावयाचे असेल तर जास्त प्रमाणात ऊर्जेची गरज असते. मात्र, तितकी ऊर्जा मिळत नाही. यामुळेच उन्हाळ्यात तापमान वाढले की, लोक पाणवठ्याच्या ठिकाणी धाव घेतात.
आता हिवाळ्यात पाणी कोमट का असते? हे आपण समजून घेऊया. खरे तर पाण्याचे तापमान हे त्याच्या अणूच्या गतीवर अवलंबून असते. पाण्याचे अणू जितक्या वेगाने हालचाल करतील, तितके जास्त पाण्याचे तापमान असू शकते. मात्र, हिवाळ्यात पाण्याचे अणू सुस्त असतात. ते एकमेकांना चिकटलेले असतात. अशा स्थितीत पाण्याचे तापमान म्हणजे थर्मल क्षमता अधिक असते. या अनोख्या वैशिष्ट्यामुळेच हिवाळ्यात कमी तापमानाचा म्हणजेच बाह्य वातावरणाचा पाण्यावर परिणाम होत नाही. म्हणूनच ते हिवाळ्यात कोमट असते.