लेकासाठी बनवला लाकडी रणगाडा | पुढारी

लेकासाठी बनवला लाकडी रणगाडा

हनोई: मुलांसाठी जीवापाड मेहनत घेणारा बाप तर आपण नेहमीच पाहत असतो, मात्र मुलांच्या हौसेपोटी माणसाला थक्क करणार्‍या गोष्टी करणाऱ्याही अनेक असतात. व्हीएतनाममधील अशाच एका हौशी बापाने आपल्या चिमुरड्या मुलासाठी चक्क लाकडी रणगाडा बनवला आहे. एखाद्या खर्‍या रणगाड्यासारख्याच आकाराचा हा रणगाडा असून त्याचा व्हिडीओ आता प्रसिद्ध झाला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की हे दोघे बाप-लेक या लाकडी रणगाड्यावर आरूढ झाले आहेत. अतिशय सुबक असा हा रणगाडा बापाने स्वतः मेहनत घेऊन बनवला असल्याचे पाहून त्याचे आणखीच कौतुक वाटते. हा लाकडी रणगाडा तयार करण्यासाठी या माणसाला एकूण 100 तासांचा अवधी लागला. तसेच त्याने यासाठी 11 हजार डॉलर्स खर्च केले.

एका जुन्या गाडीवर ही कलाकारी करून त्याने हा लाकडी रणगाडा बनवला आहे. या रणगाड्यावर बसताच चिमुकल्याच्या चेहर्‍यावरील आनंदच बापाच्या श्रमाचे सार्थक करतो! या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

Back to top button