12000 year old human fitness | 12,000 वर्षांपूर्वीचा माणूस होता सुपरफिट!

मजबूत दात, तुटलेली बरगडी स्वतःहून जुळल्याचे पुरावे
12000 year old human fitness
12000 year old human fitness | 12,000 वर्षांपूर्वीचा माणूस होता सुपरफिट!
Published on
Updated on

कोकिम्बो (चिली) : आजच्या आधुनिक काळात आपण आरोग्यासाठी जिम, डाएट आणि विविध औषधांचा आधार घेतो. मात्र, तब्बल 12,000 वर्षांपूर्वीचा माणूस आजच्या मानवापेक्षा कितीतरी पटीने अधिक सुदृढ आणि सुपरफिट होता, अशी माहिती एका नव्या संशोधनातून पुढे आली आहे.

दक्षिण अमेरिकेतील चिली देशात सापडलेल्या एका प्राचीन सांगाड्याने जगभरातील वैज्ञानिकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. हा शोध कोणत्याही नियोजित उत्खननातून लागलेला नाही. चिलीच्या कोकिम्बो प्रांतात डे्रनेजसाठी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असताना कामगारांना काही हाडे सापडली. पुरातत्त्वशास्त्रज्ञ सीजर मेंडेझ यांनी जेव्हा याची तपासणी केली, तेव्हा त्यांना हा सुमारे 12,000 वर्षांपूर्वीचा मानवी सांगाडा असल्याचे समजले. त्याला मॅन ऑफ लॉस विलोस असे नाव देण्यात आले आहे.

या सांगाड्याच्या तपासणीत शास्त्रज्ञांना काही थक्क करणार्‍या गोष्टी आढळल्या. आजच्या काळात 40 व्या वर्षी दात पडणे किंवा खराब होणे सामान्य आहे. मात्र, 12,000 वर्षांपूर्वीच्या या व्यक्तीचे दात अत्यंत मजबूत स्थितीत होते. त्याच्या आहारात साखरेचा अभाव आणि नैसर्गिक अन्नामुळे त्याचे दात आजही शाबूत आहेत. तपासणीत असे दिसून आले की, या व्यक्तीची एक बरगडी कोणत्या तरी अपघातात तुटली होती. विशेष म्हणजे, त्याकाळी कोणतेही आधुनिक उपचार नसतानाही ती बरगडी नैसर्गिकरीत्या पूर्णपणे जुळली होती. यावरून त्या काळातील मानवाची रोगप्रतिकारक शक्ती आणि घाव भरून काढण्याची क्षमता किती अफाट होती, हे सिद्ध होते. या मॅन ऑफ लॉस विलोसचे वय मृत्यूसमयी 40 ते 45 वर्षे असावे, असा अंदाज आहे. त्या युगात हे वय दीर्घायुष्याचे मानले जात असे. हा व्यक्ती प्रामुख्याने मासे आणि समुद्री अन्न खाऊन जगत होता. तो शिकारी होता आणि त्याचे शरीर शारीरिक कष्टांमुळे अत्यंत लवचिक आणि मजबूत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news