कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी मिळाले नवे शस्त्र

कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी मिळाले नवे शस्त्र
Published on
Updated on

लंडन : कर्करोगासारखा घातक आजार आणि त्याच्या उपचारामधील गुंतागुंत आजही विज्ञानासमोर एक आव्हान बनून राहिलेले आहे. त्यामुळे या दिशेने सातत्याने नवे संशोधन केले जात असते. आता युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या वैज्ञानिकांनी कर्करोगाच्या उपचारासाठी नवी पद्धत विकसित केली आहे. त्यामध्ये ट्यूमरला भाजून नष्ट करण्यासाठी मेंदूच्या माध्यमातून मॅग्नेटिक सीडला मार्गदर्शन करण्यासाठी एमआरआय स्कॅनरचा वापर केला जातो.

'अ‍ॅडव्हान्स्ड सायन्स' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. उंदरांवर केलेल्या याबाबतच्या प्रयोगाला 'मिनिमली इन्वेसिव इमेज-गायडेड अ‍ॅब्लेशन' म्हणजेच 'मिनिमा' असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये एका ट्यूमरसाठी नेव्हिगेटेड फेरोमॅग्नेटिक थर्मोसीडचा वापर केला जातो जो एमआरआय स्कॅनरपासून निघणार्‍या प्रॉपल्शन ग्रेडिएंटने 'गाईड' केला जातो.

या पद्धतीने ग्लियोब्लास्टोमावरील (मेंदू किंवा मेरूदंडाचा कर्करोग) प्रभावी व अचूक उपचार केला जाऊ शकतो. अशा प्रकारच्या कर्करोगामध्ये ट्यूमरपर्यंत पोहोचणे सोपे नसते, त्यामुळे हे संशोधन महत्त्वपूर्ण आहे. या कर्करोगाबरोबरच प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगामधील उपचारालाही ही पद्धत लाभदायक ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news