105 Year Old Tractor Auction | ‘भंगार’ समजलेल्या 105 वर्षांपूर्वीच्या ट्रॅक्टरची सव्वा कोटीला विक्री

105 Year Old Tractor Auction
105 Year Old Tractor Auction | ‘भंगार’ समजलेल्या 105 वर्षांपूर्वीच्या ट्रॅक्टरची सव्वा कोटीला विक्री
Published on
Updated on

जालंधर ः पंजाबच्या जालंधरमध्ये भंगार समजलेला 105 वर्ष जुना जर्मन ‘लांझ बुलडॉग एचएल-12’ ट्रॅक्टर 1.25 कोटी रुपयांना विकला गेला आहे. हा ट्रॅक्टर 1921 मध्ये जर्मनीच्या मॅनहाईम येथे हेनरिक लांझ कंपनीने बनवला होता. अमेरिकेतील एका खरेदीदाराने तो विकत घेतला आहे. आता हा ट्रॅक्टर कॅलिफोर्नियातील एका प्रसिद्ध कृषी संग्रहालयात प्रदर्शनासाठी जाणार आहे. लोकांना भंगार वाटणारी ही वस्तू आज जगभर चर्चेचा विषय बनली आहे. व्हायरल व्हिडीओमुळे ही बातमी सर्वत्र पसरली.

हा ट्रॅक्टर 12 हॉर्सपॉवरचा सिंगल सिलिंडर ‘हॉट बल्ब इंजिन’ चा असून, तो सुरू करण्यासाठी इंजिन गरम करावे लागते. कमी वेगातही खूप काम करतो. शेत नांगरणे, पाणी पंप करणे, गिरणी चालवणे असे अनेक कामे तो करायचा. 1921 ते 1950 पर्यंत बनवलेल्या या मालिकेतील ट्रॅक्टर जगात खूप दुर्मीळ आणि मौल्यवान आहेत. जर्मन शेती तंत्रज्ञानाचे प्रतीक मानले जातात. मूळतः बि—टिशांकडे असलेला हा ट्रॅक्टर नंतर पंजाबच्या एका शेतकर्‍याकडे आला. शहीद भगत सिंह चौकाजवळील एका जुन्या इमारतीत दशकानुदशके हा ट्रॅक्टर गंजलेल्या अवस्थेत पडला होता.

लोक त्याला भंगार समजायची, मुले त्यावर खेळायची. त्याचा मालक 40 वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाला होता. त्यामुळे इथे कोणीही त्याची किंमत ओळखली नाही. स्थानिक लोकांसाठी तो ट्रॅक्टर म्हणजे फक्त जुनी वस्तू होती; पण ट्रॅक्टर प्रेमींसाठी तो खजिना होता! सुमारे अडीच महिने आधी एक इन्स्टाग्राम ळपषर्श्रीशपलशी ने व्हिडीओ टाकला आणि तो व्हायरल झाला. जालंधरचे स्थानिक काऊन्सिलर पुनीत वढेरा यांनीही व्हिडीओ बनवले. मुंबईतील एका कंपनीने सुरुवातीला 2 लाख मग 28 लाख रुपये ऑफर केले; पण मालकाने नाकारले.

17 फेब्रूवारी 2026 रोजी अमेरिकेतील खरेदीदाराशी व्हिडीओ कॉलवर बोलून 1.25 कोटी रुपयांत विक्री झाली. जगभरातील विंटेज ट्रॅक्टर संग्राहकांनी ही बातमी पसरवली. 18 फेब्रूवारीला क्रेनने ट्रॅक्टर उचलून ट्रकने मुंबई बंदरावर नेला. तेथून जहाजाने कॅलिफोर्नियाला पाठवण्यात आला आहे. आता तो कॅलिफोर्निया कृषी संग्रहालयात (हेड्रिक ट्रॅक्टर कलेक्शन) मुख्य आकर्षण बनणार आहे. आपल्याला जे भंगार वाटत होते ती वस्तू कोट्यधीश बनवणारी ठरली, याचे जालंधरच्या लोकांना आश्चर्य वाटते. जुन्या वस्तूंची किंमत ओळखणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news