South Sinai ancient heritage | दक्षिण सिनाई वाळवंटात 10 हजार वर्षे जुन्या ऐतिहासिक वारशाचा शोध

South Sinai ancient heritage
South Sinai ancient heritage | दक्षिण सिनाई वाळवंटात 10 हजार वर्षे जुन्या ऐतिहासिक वारशाचा शोध
Published on
Updated on

कैरो : इजिप्तमधील दक्षिण सिनाई वाळवंटात पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी एका ऐतिहासिक ‘रॉक शेल्टर’चा (खडकातील नैसर्गिक आश्रयस्थान) शोध लावला आहे. या ठिकाणी सुमारे 10 हजार वर्षांच्या कालखंडातील विविध नक्षीकाम आणि कोरीव लेख सापडले असल्याची माहिती इजिप्तच्या पर्यटन आणि पुरातत्त्व मंत्रालयाने दिली आहे.

‘उम्म अराक’ पठारावर असलेल्या या जागेचा शोध तज्ज्ञांच्या एका पथकाने एका पुरातत्त्व सर्वेक्षणादरम्यान लावला. या मोहिमेत स्थानिक रहिवासी ‘शेख रबी बराकत’ यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच दुर्गम भागातील या ऐतिहासिक स्थळापर्यंत पोहोचणे शक्य झाले. हे आश्रयस्थान सुमारे 330 फूट (100 मीटर) लांब आणि 10 फूट खोल असून, याची उंची 5 फुटांपर्यंत आहे. यातील सर्वात जुनी चित्रे ख्रिस्तपूर्व 10,000 ते 5,500 या काळातील आहेत, जी इजिप्तमधील राजेशाही काळापेक्षाही (सुमारे 3100 ख्रिस्तपूर्व) जुनी आहेत.

या खडकांवर मानवी उत्क्रांतीचे विविध टप्पे पाहायला मिळतात :

प्राचीन काळ : सुरुवातीच्या चित्रांमध्ये धनुष्यबाण घेतलेला शिकारी आणि त्याच्यासोबत असलेले दोन शिकारी कुत्रे दिसून येतात.

मध्ययुगीन काळ : नंतरच्या काळातील चित्रांमध्ये घोडेस्वारी करणारे लोक आणि विविध शस्त्रे घेतलेले योद्धे दिसतात.

भौमितिक आकृत्या: येथे चौकोन, अंडाकृती आकार, चंद्रकोर आणि ’एक्स’ चिन्हांच्या गुंतागुंतीच्या रचनाही आढळल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, हे ठिकाण प्राचीन तांबे आणि ‘फिरोझा’ दगडांच्या खाणींजवळ आहे. त्यामुळे खाणकामासाठी येणारे लोक या जागेचा वापर विश्रांतीसाठी किंवा टेहळणीसाठी करत असावेत. येल विद्यापीठातील प्राध्यापक जॉन डार्नेल यांच्या मते, सिनाईमधील नैसर्गिक साधनसंपत्ती शोधण्यासाठी आलेल्या प्राचीन मानवांनीच येथे आपल्या खुणा मागे ठेवल्या असाव्यात. सध्या पुरातत्त्व विभागाचे पथक या चित्रांच्या आणि कोरीव कामाच्या अधिक सखोल अभ्यासात मग्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news