Solar Farm 100 Sheep Employees | कार कंपनीच्या सोलर फार्ममध्ये १०० मेंढ्या ‘कर्मचारी’!

Solar Farm 100 Sheep Employees |
Solar Farm 100 Sheep Employees | कार कंपनीच्या सोलर फार्ममध्ये १०० मेंढ्या ‘कर्मचारी’!
Published on
Updated on

पोझनान (पोलंड) : जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी एक असलेली फॉक्सवॅगन आपल्या हायटेक कारखान्यात गवत कापण्यासाठी मानवांना किंवा अत्याधुनिक यंत्रांना हटवून मेंढ्यांना कामावर ठेवू शकते, असा विचार तुम्ही कधी केला आहे का? ऐकायला थोडे आश्चर्यकारक वाटेल; पण फॉक्सवॅगनने ही गोष्ट प्रत्यक्षात आणली आहे. पर्यावरण रक्षण, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि मेंटेनन्सच्या मोठ्या खर्चापासून वाचण्यासाठी कंपनीने आपल्या अवाढव्य सोलर प्लांटमध्ये १०० मेंढ्यांची 'स्पेशल फोर्स' तैनात केली आहे.

टेक आणि ऑटो जगतात खळबळ उडवून देणारा फॉक्सवॅगनचा हा अनोखा प्रयोग केवळ गवत कापण्यापुरता मर्यादित नसून, त्यामागे एक मोठे आणि रंजक वैज्ञानिक कारण दडले आहे. फॉक्सवॅगनने पोलंडमधील आपल्या मोठ्या सोलर फार्ममध्ये गवत कापणाऱ्या मशिन ऐवजी १०० मेंढ्यांच्या कळपाला कामावर लावले आहे. हा अनोखा उपक्रम पोलंडमधील पोझनान येथे सुरू आहे, जिथे फॉक्सवॅगन आपली इलेक्ट्रिक कमर्शिअल व्हॅन 'e-Crafter' तयार करते. या कारखान्याला वीज पुरवण्यासाठी ३१,००० हून अधिक सोलर पॅनल्स बसवण्यात आले आहेत.

आता या पॅनल्सच्या खाली उगवणारे गवत लहान ठेवण्याची जबाबदारी या मेंढ्यांवर सोपवण्यात आली आहे. या तंत्रज्ञानाला 'ॲग्रीव्होल्टेईक्स' (Agrivoltaics) म्हटले जात आहे, ज्यामध्ये एकाच जमिनीवर सौरऊर्जाही निर्माण केली जाते आणि सोबत शेती किंवा पशुपालनही केले जाते. बर्लिनच्या 'क्वांटा एनर्जी' या ग्रीन फर्मने तयार केलेल्या या १८.३ मेगावॅटच्या सोलर प्लांटमुळे कारखान्याची वार्षिक २५ टक्के विजेची गरज पूर्ण होते. उन्हाळ्यात तर हा प्लांट कारखान्याची १०० टक्के विजेची मागणी एकट्यानेच पूर्ण करतो. मेंढ्या नैसर्गिकरीत्या गवत खात असल्याने आता डिझेल-पेट्रोलवर चालणाऱ्या मशिन्सची गरज उरलेली नाही.

यामुळे फॉक्सवॅगनचा देखभाल खर्च (मेंटेनन्स) कमी झाला आहेच, शिवाय कार्बन उत्सर्जनातही मोठी घट झाली आहे. गवत कापणाऱ्या मशिन चालवताना उडणारे दगड किंवा कचरा यामुळे महागडे सोलर पॅनल्स फुटण्याचा मोठा धोका असायचा, तो धोका आता पूर्णपणे टळला आहे. फॉक्सवॅगनचा हा प्रकल्प केवळ गवत कापण्यापुरता मर्यादित नाही, तर हे एक मोठे वैज्ञानिक संशोधनही आहे. यासाठी कंपनीने ‘पोझनान युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ सायन्सेस’च्या शास्त्रज्ञांशी हातमिळवणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news