

डरहॅम : आजच्या घडीला सोने ही जगभरातील लोकांची पहिली पसंती आहे. दागिने बनवण्यासाठी आणि समारंभात शोभा वाढवण्यासाठी लोक सोन्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मात्र, एक धातू सोन्याला जबरदस्त टक्कर देत असून, येत्या 10 वर्षांत सोन्या-चांदीची लोकप्रियता बाजूला पडली तरी त्यात आश्चर्याचे कारण असणार नाही, असा काही अभ्यासकांचा दावा आहे.
आज सोने हे श्रीमंतीचे प्रतीक मानले जाते आणि त्यात तथ्यही आहे. याचमुळे त्याला मोठी मागणी असते. मात्र, आता झिंक या धातूची मागणी प्रचंड वाढणार आहे. झिंक दिसायला चांदीसारखे असते. पण, त्याची किंमत सोन्याच्या तुलनेत अनेक पटीने कमी आहे. झिंकचा वापर ब्रास (पितळ), निकेल सिल्व्हर आणि अॅल्युमिनियममध्ये केला जातो. भारतीय बाजारातही झिंकची मागणी झपाट्याने वाढत आहे.
इंटरनॅशनल झिंक असोसिएशननुसार, सध्या भारतात दरवर्षी 1.1 मिलियन टन झिंक वापरले जाते. आकडा 2 मिलियन टनांवर जाण्याची शक्यता आहे. असोसिएशनचे कार्यकारी संचालक अँर्ड्यू ग्रीन यांनी सांगितलं की, सध्या भारतात झिंकची मागणी उत्पादनापेक्षा अधिक आहे. जागतिक स्तरावर झिंकचं वार्षिक उत्पादन 13.5 मिलियन टन आहे. मात्र, भारतात प्रति व्यक्ती झिंकचा वापर जागतिक सरासरीच्या तुलनेत 4-5 पट कमी आहे.
झिंकचा उपयोग विविध मिश्रधातू जसे की ब्रास, निकेल सिल्व्हर आणि अॅल्युमिनियम सोल्डर मध्ये होतो. याशिवाय, झिंकचा वापर पेंट, रबर, कॉस्मेटिक उत्पादने, औषधे, प्लास्टिक आणि इलेक्ट्रिकल उपकरणे बनवण्यासाठी केला जातो. झिंक दिसायला चांदीसारखं असून, त्याची किंमत फक्त 270 रुपये प्रति किलो आहे. भारतासारख्या देशात झिंकच्या वाढत्या मागणीमुळे आगामी काळात या धातूचं महत्त्व प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. झिंकच्या किफायतशीर किमतीमुळे आणि त्याच्या औद्योगिक उपयोगांमुळे येत्या काही वर्षांत सोन्याची लोकप्रियता झिंकसमोर फिकी पडेल, असं तज्ज्ञांचे मत आहे.