Mumbai Hoarding Collapse : ‘चंदा लो, धंदा दो’ या महायुतीच्या धोरणामुळे होर्डिंग दुर्घटना : विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेला महायुती सरकार जबाबदार आहे. सरकारच्या भोंगळ कारभारामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप माणसांचा जीव गेला. 'चंदा लो, धंदा दो' अशा पद्धतीने महायुतीचा कारभार सुरु असल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आज मंगळवारी (दि. १४) रोजी विजय वडेट्टीवार यांनी घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सरकारला धारेवर धरले.

वडेट्टीवार म्हणाले की, घाटकोपरची घटना हादरवून सोडणारी आहे. ही घटना प्रशासनाच्या आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे झाली आहे. मुंबईचे पालकमंत्री पालिकेत निधी वाटप करायला बसतात. अशा घटनांकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे. एवढे मोठे होर्डिंग का उभे केले जाते? याकडे कोणाचेच लक्ष नाही. महानगर पालिकेचे अधिकारी काय करतात हा प्रश्न आहे. फक्त टक्केवारीत सगळे अडकले आहेत. जबाबदारीतून कोणाला पळ काढता येणार नाही. अधिवेशनात आम्ही हा विषय लावून धरणार आहे.

मृत्यूची संख्या १४ पेक्षा जास्त असल्याचे आम्हाला समजलं आहे. यासंदर्भातील तक्रादारांचा अर्ज जिल्हाधिकारी अमान्य करतात यावरून प्रशासन किती गंभीर आहे हे लक्षात येते. राजेवाडी येथील रुग्णालयात वडेट्टीवार यांनी जखमींची विचारपूस केली. सरकारने मृतांच्या नातेवाईकांना दिलेली मदत वाढविली पाहिजे. दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी वडेट्टीवार यांनी केली आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news