

पुढारी ऑनलाईन डेस्क : तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ्याची एसआयटी (SIT) चौकशी व्हावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 200 पैकी 214 गुण एका उमेदवाराला मिळत असेल, तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करत आहे. आणि सत्ताधाऱ्यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवला आहे, आता स्पष्ट होत आहे, अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.
हेही वाचा