OBC Leaders on Manoj Jarange: मनोज जरांगेना आंदोलन करून काय मिळालं याचा अभ्यास करावा; ओबीसी नेत्यांचा घणाघात

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरुन ओबीसी नेते लक्ष्मण हाके, बबनराव तायवाडे आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकार आणि जरांगेवर निशाणा साधला आहे.

मनोज जरांगे मुंबईत गेले असते तर सरकारने त्यांना खतपाणी घातलं नसतं त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे केल्याची टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाकेनी केलेली आहे तर बबनराव तायवाडे यांनी 20 दिवसांच्या उपोषणातून मराठा समाजाला काय मिळालं याचा अभ्यास करावा असा जरांगेना सल्ला दिला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी सरकार जरांगे समोर वारंवार झुकत असल्याची टीका केली आहे. तायवाडे यांनी ओबीसीचे नुकसान झालं नाही सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झालेला नाही त्यामुळे त्यांना काय मिळालं याचा अभ्यास त्यांना करायचा आहे असं वक्तव्य केले.

सरकार नेहमी जरांगेच्या पुढे झुकत आहे एवढ्या शिव्या खाऊनही मला वाटतं की देशातील अस एकमेव राज्य सरकार असेल महाराष्ट्रातल मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापासून तर उपमुख्यमंत्र्यापर्यंत सगळ्यांना शिव्याशाप दिल्यावरही शिष्ट मंडळ जाऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच आश्वासन देतात आणि आंदोलन स्थगित होत. यावरून या सरकारला आता शिव्या खायची सवय झाली आहे आणि जरांगे पाटलांच्या शिव्या खाल्याशिवाय या सरकारच पोट भरत नाही यांना समाधानही मिळत नाही अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रात आहे अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

मी कायम सांगत आलो होतो की मनोज जरांगे मुंबईला जाणार नाही दुर्दैव हे आहे की या अनपड या बिनढोक माणसाच्या सांगण्यावरन लाखो ओबीसींची प्रमाणपत्र जर मराठा समाजाला वाटली गेली असतील तर मला वाटतय आज रोजी की मराठा समाज हा ओबीसी मध्ये लाखो ओबीसी च कुणब्याची सर्टिफिकेट घेऊन या आरक्षणामध्ये आलेला आहे दुर्दैव असं की महाराष्ट्रामधल्या ओबीसी च आरक्षण सरकारने जनरल वॉर्ड बनवून टाकलेला आहे हे आमचं ओबीसी च दुर्दैव असल्याचे वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news