रस्त्यावरचे खड्डे आणि खड्ड्यात गेलेले रस्ते.. असं अतिशय रद्दड दर्जाच्या रस्त्यांवरचं कवित्व दरवर्षी ऐकू येतं... आता तर काय.. रस्ते या विषयावरचं यश दाखवण्यासाठी आम्ही रस्तेबांधणीचा वेग कसा वाढवला याचे पुरावे दिले जातात.. ते पुरावे खोटे अजिबात नाहीत.
रस्ते बांधणीचा वेग खरंच वाढला आहे.. नवनवे महामार्ग आपल्याला दिसतायत ज्यावर आपण आपली फायटर जेट्स सुद्धा उतरवू शकतो.. मग शहरातल्या रस्त्यांनाच अशी काय धाड भरते.. इथल्या रस्त्यांनाच अशी सापत्न वागणूक मिळते काय... जे सरकार इतके सुंदर ड्रीम प्रॉजेक्टवाले हायवे बांधतं ते सरकार शहरातले रस्ते इतक्या रद्दड अवस्थेत का ठेवतं.. बरं रस्त्यांसाठी बजेट नसतं असं अजिबात नाही... हजारो कोटींचं बजेट नुसत्या रस्तेदुरुस्तीसाठी असतं.. पण कोट्या नावाखाली रस्त्याला डांबर आणि करदात्यांच्या तोंडाला पानं पुसली जातात असं दिसतंय कारण पहिल्या पावसात सगळं मुसळ केरात जातं आणि रस्त्यांची लक्तरं झालेली दिसतात.. सो कॉल्ड इंटरनॅशनल सिटी राजधानी मुंबई यातून सुटलेली नाही.. नाशिकनंतर गेल्या काही दिवसात या खड्ड्यांनी घेतलेले पाच बळी महाराष्ट्राने पाहिलेत. पुणे, वर्धा इतर सगळ्या शहरात तेच... मग आम्ही बापड्या नागरिकांनी करायचं काय या जीवघेण्या रस्त्यांना जबाबदार कोण? पहा पुढारी न्यूजवरील 'धुरळा'.