Beed Crime News
बीड: बीडमधील एका गावामधून धक्कादायक प्रकार धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून गावाबाहेर नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला, त्यानंतर तिला गावामध्ये आणून गावच्या चावडीवर खांबाला बांधून ठेवण्यात आले. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात येताच विवाहितेची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयीत आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला १७ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेत आणखी धक्कादाय गोष्ट म्हणजे जी विवाहिता ती अल्पवयीन आहे. तक्रारीमध्ये तिचे वय १७ वर्ष असे नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच तिचा बालविवाह झाला होता आणि बालविवाहानंतर पुन्हा एकदा तिच्या नशिबी हा सगळा भयंकर प्रकार आला आहे. पीडितेवर अत्याचार करण्यात आल्यानंतर आरोपीने तिला गावच्या चावडीमध्ये बांधून ठेवले. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.