हरणा नदीकाठावर रंगल्या बैलगाडा शर्यती

हरणा नदीकाठावर रंगल्या बैलगाडा शर्यती
Published on
Updated on

हंजगी : पुढारी वृत्तसेवा हन्नुर (ता. अक्कलकोट) येथील हरणा नदीकाठावर कारहुणवी यात्रा महोत्सवाचे औचित्य साधून तालुक्यात प्रथमच सागर कल्याणशेट्टी मित्र परिवाराच्यावतीने आयोजित बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन उत्साहात झाले. अक्कलकोट तालुक्यात पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. यावेळी चडचण, सोलापूरसह परिसरातील जवळपास 30 बैलजोड्या दाखल झाले आहेत. अध्यक्षस्थानी मोतीराम राठोड उपस्थित होते. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते जगद्ज्योती श्री महात्मा बसवेश्वर प्रतिमेचे पूजन करुन दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर भाजपा माजी जिल्हा अध्यक्ष शहाजी पवार, सिध्देश्वर कल्याणशेट्टी, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, संयोजक तथा उपसरपंच सागर कल्याणशेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिल बंडगर, बसवंतराव कलशेट्टी, रिपाइंचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ दिनेश मुरुमकर, शिवा संघटनेचे नेते अरविंद भडोळे पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर यादवाड, नगरसेवक महेश हिंडोळे, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, नायब तहसीलदार विकास पवार, पीएसआय चंद्रकांत पुजारी, पंचायत समिती सदस्य, विवेकानंद उंबरजे, अप्पासाहेब बिराजदार, परमेश्वर पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. सतत दोन दिवस चालणार्‍या या बैलगाडा शर्यतीसाठी प्रथम बक्षीस म्हणून एक तोळे सोने, द्वितीय बक्षीस रोख अकरा हजार रुपये व तृतीय बक्षीस म्हणून पाच हजार रुपयांचे बक्षी ठेवण्यात आले आहे. हरणानदीच्या काठावर यंदा पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत आयोजित केल्याने हरणानदीचा काठ बैलगाड्याने फुलून गेला होता. या बैलगाडा शर्यत पाहणार्‍या कुरनूर धरण पट्ट्यातील शेतकर्यात उत्साहा पहायला मिळाला.

दोनशे मीटर अंतरा पर्यंत बैलगाडा शर्यतीसाठी हरणानदीच्या काठावर मैदान तयार करण्यात आले होते. या बैलगाडा शर्यतीत चडचण, निलेगाव, पितापूर, तोळणूर, सोलापूर, देगाव, नागणसूर, हैद्रा आदी गावांतील प्रसिद्ध जवळपास तीस बैलगाडा चालक सहभागी झाले होते. ही बैलगाडा शर्यत यशस्वी होण्यासाठी संयोजन समिती सदस्य राम पारतनाळे, भिम व्हनमाने, ग्रा पं सदस्य श्रीकांत बकरे, रेवणसिध्द सुतार, अजय देवकते, राजू बंदिछोडे, हेगडे, नवनाथ व्हनमाने, लक्ष्मण पुजारी, बसवराज पारतनाळे, महेश चितळे, विशाल सरसंबे,गुडूभाई जमादार, राजेंद्र पाटील,स्वामीनाथ रोट्टे,अनिल तळवार,जोक पाटील आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रा गौतम बाळशंकर यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news