

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा आयटी कंपनीत नोकरीस असलेल्या तरुणीला प्रेमाचे नाटक करून जवळीक करत, लग्न करतो म्हणून ओळख वाढवली. तिचा विनयभंग केला. चार वर्षे हा प्रकार चालला. लग्नाची विचारणा करताना तू दुसर्या जातीची आहे म्हणून लग्नाला नकार दिला. तिचे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याची तक्रार तरुणीने जेलरोड पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार शंतनू कोल्हापुरे व रूपेश महिंद्रकर या दोघांविरुद्ध विनयभंग व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापुरात राहणारी तरुणी एका आयटी कंपनीत नोकरीस आहे. सध्या तिचे सोलापुरात वर्क फ्रॉम होम सुरू आहे. चार वर्षापासून तिची शंतनू गजानन कोल्हापुरे या तरुणाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. फेब्रुवारी 22 मध्ये शंतनूने तिला घरी बोलावून घेतले. लग्नाचे आमिष दाखवून लज्जास्पद वर्तन केले. लग्नाबद्दल विचारणा केली असता 'तू दुसर्या जातीची आहेस, असे म्हणून लग्नास नकार दिला. पुढे बोलणेही टाळले.
पुढे त्या तरूणीने शंतनूस फोन केला असता त्याने तो मित्र रुपेश महिंद्रकर याला दिला. त्याने तरूणीस तू माझ्या मित्राचा नाद सोडून दे नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करायला लावेन, अशी धमकी दीली. त्यामुळे पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरुन शंतनू गजानन कोल्हापुरे व रूपेश महिंद्रकर या दोघांविरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.