वास्कोत खनिजवाहू बार्ज बुडाली; आठ जणांना वाचविले

वास्कोत खनिजवाहू बार्ज बुडाली; आठ जणांना वाचविले

वास्को: पुढारी वृत्तसेवा : मुरगाव बंदरापासून काही अंतरावर नांगरण्यात आलेली रिओ मार्टिना ३ ही खनिजवाहू बार्ज सोमवारी सायंकाळी बुडाली. या बार्जवर आठ क्रू मेंबर्स होते. त्यांना वाचविण्यात यश आले.

खनिज घेऊन आलेली सदर बार्ज मुरगाव बंदरापासून काही अंतरावर असलेल्या ब्रेक वॉटरजवळ नांगरण्यात आली होती. या बार्जमधील खनिज जहाजामध्ये उतरविण्याचे काम सुरू होते. बार्जमधील अर्धे खनिज उतरविण्यात आल्यावर समुद्राला उधाण आल्याने तसेच सोसाट्याचा वारा सुटल्याने खजिन उतरून घेण्यास अडचण निर्माण झाली. त्यामुळे काम बंद ठेवण्यात आले होते. समुद्राला उधाण आल्याने व सोसाट्याचा वारा सुटल्याने खजिन उतरून घेताना बार्ज व जहाज एकमेकावर आपटण्याची शक्यता होती.

त्यामुळे काम थांबविण्यात येऊन जहाजापासून काही अंतरावर बार्ज नांगरण्यात आली. समुद्राला उधाण व सोसाट्याच्या वाच्यामुळे बार्जला हेलकावे बसू लागले. त्यामुळे इंजिन रुममध्ये पाणी शिरून काही अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे बार्जवरील क्रू मेंबर्सनी मदतीसाठी हाक दिली. तेथे असलेली एक बार्ज मदतीसाठी आली. त्या बार्जवर आठही क्रू मेंबर्सला घेण्यात आला. त्यानंतर काही वेळात ती बार्ज बुडाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news