बार्शी प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर

बार्शी प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर
बार्शी प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर

बार्शी : पुढारी वृत्तसेवा आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी बार्शी नगर परिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. 21 प्रभागांमधून 42 सदस्य यंदा निवडून जाणार आहेत. प्रथमच अनुसूचित जमातीसाठी एक जागा राखीव झाली आहे. 2011 च्या जनगणनेनुसार 1 लाख 18 हजार 722 मतदारांची लोकसंख्या निश्चित करण्यात आल्याची माहिती नगर परिषदेच्या प्रशासक व मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी दिली.

नगर परिषदेच्या 21 प्रभागांमध्ये 42 सदस्य निवडले जातील. एका प्रभागामध्ये दोन जागा असणार आहेत. अनुसूचित जाती-जमाती राखीव जागांची संख्या 7 असून अनुसूचित जमातीसाठी एक जागा राखीव आहे. स्त्रियांसाठी 21 जागा राखीव ठेवण्यात आल्या असून अनुसूचित जातीसाठी 4, तर सर्वसाधारण स्त्रियांसाठी 21 जागा आहेत. एका प्रभागामध्ये सरासरी लोकसंख्या 5 हजार 653 आहे. एका प्रभागाची कमाल लोकसंख्या 6 हजार 218, तर किमान 5 हजार 88 आहे. संपूर्ण शहरात 60 हजार 801 पुरुष व 57 हजार 921 स्त्री, असे 1 लाख 18 हजार 722 मतदार संख्या निश्चित करण्यात आली आहे.

अनुसूचित जातीची लोकसंख्या 9 हजार 386 पुरुष, तर 8 हजार 988 स्त्री, अशी एकूण 18 हजार 374 आहे. अनुसूचित जमाती लोकसंख्या 777 पुरुष, तर 703 स्त्री, अशी 1 हजार 480 आहे, असेही दगडे-पाटील यांनी सांगितले. प्रगणक गटांचे नकाशे, गुगल अर्थ व संगणीकृत नकाशांचा वापर राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निर्देश व सूचनांचे तंतोतंत पालन प्रभागांच्या हद्दीचे वर्णन, व्याप्ती, लोकसंख्या, आरक्षण योग्य असल्याची खात्री करण्यात आली आहे. प्रभाग रचनेचा अंतिम नकाशा प्रसिद्ध झाला, असेही दगडे-पाटील यांनी सांगितले.

उद्या आरक्षण सोडत

येत्या नगरपरिषद निवडणुकीत बार्शी नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच अनुसूचित जमातीसाठी एक जागा राखीव असणार आहे. सर्व प्रभागांतील आरक्षण सोडत यशवंतराव चव्हाण सभागृहात 13 जून रोजी होणार आहे. याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news