पालखीमार्गांवर कोव्हिड केअर, विलगीकरण केंद्र

पालखीमार्गार्ंवर कोव्हिड केअर, विलगीकरण केंद्र
पालखीमार्गार्ंवर कोव्हिड केअर, विलगीकरण केंद्र

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा कोरोनाची दक्षता घेण्यासाठी पालखी मार्गावर विलगीकरण व कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. जिल्हा परिषदेत गटविकास अधिकारी व जिल्ह्यातील पाच पालखी मार्गावरील संबंधित अधिकारी व कर्मचारी व ग्रामसेवक यांची बैठक सीईओ स्वामी यांनी घेतली. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

यात्रा कालावधीत महिलांची मोठी कुचंबना होते. महिला साठी स्वतंत्र शौचालय सुविधा करणेत येणार आहे. 8 हजार शौचालयामध्ये 50 टक्के शौचालये महिलांसाठी आरक्षित असणार आहेत, दर पाच किमीवर सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी खासगी, सार्वजनिक व भाडेततत्वावर घेणेत आलेली शौचालये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. माता बालक यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येत आहे. यासाठी स्वतंत्र महिला अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे स्वामी यांनी सांगितले. पत्रावळी, चहा व पाणी पिणेचे प्लास्टीक ग्लास, कप, पिशव्या, यामुळे मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा तयार होते. हा कचरा रोखणे साठी व संकलनासाठी प्रबोधन करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news