मळोली : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मळोली (ता. माळशिरस) या प्रशालेचा निकाल 100 टक्के लागला.
प्रशालेमधून जाधव गौरी हनुमंत 92.80 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला तर द्वितीय क्रमांक जाधव वैष्णवी मोहन 92.20, टक्के आणि तृतीय क्रमांक जाधव सृष्टी भाऊसो 91.60 टक्यासह मिळाला.
या प्रशालेतील एकूण 94 विद्यार्थी परीक्षेला बसलेले त्यातील विशेष प्रावीण्य श्रेणीत 65 माळशिरस तालुक्यात सर्वाधिक, प्रथम श्रेणीत 26तर द्वितीय श्रेणी मध्ये 03 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांची संस्थेचे अध्यक्ष रणजितसिंह जाधव, संस्थेचे मार्गदर्शक सत्यजित जाधव, सरपंच अर्चना जाधव, प्राचार्य जाधव बी. आर. यांनी अभिनंदन केले.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रशालेचा 100 टक्के निकाल लागल्या बद्द्ल मळोली ग्रामस्थ, रणजितसिंह जाधव मित्र मंडळ व जय भवानी नवरात्र मंडळ मळोली यांच्या वतीने सर्व शिक्षकांचे सत्कार करण्यात आले. यावेळी रणजितसिंह जाधव, सुरेश जाधव, राजेंद्र जाधव, आप्पासो जाधव, पोपट काळे, संजय गुजर, बाळबापू जाधव व शिक्षण बंधू भगिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अभिजित जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन जाधव पी. एस. यांनी मानले.