

भोसे (क.): पुढारी वृत्तसेवा खेडभोसे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बेबीताई धनाजी साळुंखे यांची, तर व्हाईस चेअरमनपदी संतोष जगन्नाथ मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी आ. प्रशांत परिचारक, आ. बबनदादा शिंदे गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले आहेत, काल झालेल्या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी निवडी वेळी पांडुरंग साखर कारखान्याचे माजी संचालक ब्रम्हदेव पवार, सोसायटीचे माजी चेअरमन अशोक पवार, माजी सरपंच कालिदास साळुंखे, विष्णू गवळी, ग्रामपंचायत सदस्य कुबेर पवार, अर्जुन पवार, सिद्राम पवार, हरिदास पवार, सचिन पवार उपस्थित होते.
यावेळी चेअरमन पदासाठी बेबीताई साळुंखे आणि व्हॉईस चेअरमन पदासाठी संतोष मोरे यांचाच एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी योगेश काकडे यांनी घोषित केले. यावेळी बोलताना नूतन चेअरमन, व्हॉईस चेअरमन यांनी सभासद, शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून काम केले जाईल, अशी ग्वाही दिली. या निवडी वेळी सरपंच आणि सोसायटीचे नूतन संचालक सज्जन लोंढे, महादेव पवार, रामचंद्र पवार, प्रशांत पवार, अनिल झांबरे, बाळासाहेब पवार, बंडू भोसले, मनीषा पवार, सुभद्रा थोरात, सोसायटीचे सचिव भारत पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, खेडभोसे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.