केम स्टेशन ः धावतात 30 गाड्या, थांबते एकच

केम स्टेशन ः धावतात 30 गाड्या, थांबते एकच
केम स्टेशन ः धावतात 30 गाड्या, थांबते एकच
Published on
Updated on

करमाळा : पुढारी वृत्तसेवा सोलापूर-पुणे रेल्वे मार्गावरील करमाळा तालुक्यातील केम रेल्वे स्टेशनवरून दररोज एक्स्प्रेस, मेल, सुपरफास्टसह पॅसेंजर अशा दिवसभरातून 30 गाड्या धावतात, मात्र, या रेल्वे स्थानकावर केवळ पुणे-सोलापूर डेमो पॅसेंजर ही एकच गाडी थांबते. त्यानंतर दिवसभर एकही गाडी थांबत नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केमचे स्टेशन असून, अडचण नसून खोळंबा असी अवस्था आहे. इतर महत्त्वाच्या गाड्या केम स्थानकावर थांबविण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे. याकडे लोकप्रतिनीधींचे दुर्लक्ष होत आहे.

करमाळा तालुक्यातील केम हे सर्वात मोठे गाव आहे. या गावची लोकसंख्या सुमारे पंधरा हजारांच्या आसपास आहे. याशिवाय आठ खेड्यांतील प्रवासी केम रेल्वे स्टेशनवरून दररोज प्रवास करतात. आता सध्या या स्टेशनवर केवळ पुणे सोलापूर डेमो पॅसेंजर सकाळी 7 च्या सुमारास थांबते. त्यानंतर दिवसभर या स्थानकावर एकही गाडी थांबत नसल्याने या स्थानकावरून लोकांना येणे-जाणे मुश्कील झाले आहे. पूर्वी या स्टेशनवर मुंबई चेन्नई मेल, हैदराबाद मुंबई, साईनगर पंढरपूर, सोलापूर पुणे डेमो पॅसेंजर या गाडया थांबत होत्या, त्यामुळे कुर्डूवाडी, पंढरपूर, बार्शी, सोलापूरला जाणार्‍या प्रवाशी व विद्यार्थ्यांना सोयीचे होते. मुंबई चेन्नई मेल सकाळी सात वाजता, केमला येत होती, त्यामुळे कुर्डूवाडी, पंढरपूर, बार्शी, सोलापूरला जाणार्‍या विद्यार्थी, प्रवासी नोकरदार यांची चांगलीच सोय होत होती.

सकाळी जाऊन दिवसभर काम करून पुन्हा सध्याकाळी येत योत होते. परंतु, कोरोनामुळे आता या स्टेशनवर थांबणार्‍या सर्व गाड्या थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर हळूहळू गाड्या पूर्वपदावर आल्या, परंतु, मुंबई चेन्नई मेल, रेल्वे विभागाने सुपरफास्ट केली व या गाडीचा केमचा थांबा रद्द करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. याकडे ना लोकप्रतीनिघीचे व जनतेचे लक्ष नाहा जायची सोय नसल्याने गरीब विद्यार्थ्यांना घरी बसायची वेळ आली महाविद्यालय शिक्षणापासून वंचित राहवे लागत आहे. हैदराबाद मुंबई या गाडीला थांबा मिळावा, यासाठी केम ग्रामस्थ व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सिराज मोमीन यानी तब्बल बारा वर्षे प्रयत्न केले, त्यानतर ही गाडी मिळाली. रेल्वे विभागाने प्रायोगिक तत्त्वावर या गाडिला थांबा देऊन रेल्वे विभागाने कलेक्शनाची अट घातली, ती पण केम ग्रामस्थानी वर्गणी करून सात लाख रूपयांची रेल्वे तिकीट फाडून अट पूर्ण केली, त्यानंतर ही गाडी कायम केली.

पुणे, मुंबईला जाणार्‍या केमसह भोंगेवाडी, मलवडी, सातोली, वडशिवणे, ऊपळवाटे, घोटी येथील प्रवाशांची सोय झाली. पुण्याहून काम करून प्रवासी सायंकाळी आठ वा, केमला येत होते तसेच या गाडीला कलेक्शन वाढले होते. प्रवाशांची संख्या वाढत गेली. सर्व सुरळीत सुरू होते. मात्र, कोरोनामुळे ही गाडी बंद झाली, त्यानंतर कोरोना आटोक्यात आला. मात्र, गाडीचा थांबा रद्द झाला. त्यामुळे नोकरदार वर्ग, विद्यार्थी आदींची गैरसोय होत आहे. रेल्वे विभागाकडून या गाडीला थांबा मिळावा, असी मागणी केम व परिसरातील प्रवाशांनी केली आहे.

मी रेल्वे विभागाला विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती करतो कि, लवकर रेल्वे विभागाने सोलापूरला जाण्यासाठी सकाळी गाडी सुरू करावी, यामुळे विद्यार्थ्यांचे तसेच नोकरदारांचे होणारे नुकसान थांबतील, तसेच रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होईल.
– प्रा. प्रशांत सावंत, भिसे कॉलेज, कुर्डूवाडी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news