कारभारी बदलला तरच कारखाना नव्या जोमाने सुरू होईल : युवराज पाटील

युवराज पाटील
युवराज पाटील

सुस्ते : पुढारी वृत्तसेवा कै. औदुंबरअण्णा पाटील यांनी रक्ताचे पाणी करून विठ्ठल कारखाना चालू केला. मात्र, सध्या कारखान्याला जी कीड लागली आहे, जोपर्यंत कारखान्याचा कारभारी बदलत नाही, तोपर्यंत कारखान्याला वैभव प्राप्त होणार नाही, असे प्रतिपादन संचालक युवराज पाटील यांनी सांगितले. सुस्ते (ता. पंढरपूर) येथे विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी युवराज पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी विठ्ठल कारखान्याचे माजी ज्येष्ठ संचालक रावसाहेब चव्हाण होते.

पाटील पुढे म्हणाले की, कारखाना चालवायला खिशात पैसे लागत नाहीत, तर बँकेत पत लागते. माझ्याकडे पैसे जरी नसले तरी कै. औदुंबरअण्णा पाटील व कै. यशवंतभाऊ पाटील यांचे निधन होऊन 25 वर्षे झाले तरी जी पूर्वी बँकेत त्यांची जी पत होती, ती पत आजही आमच्या घराण्यांनी कायम ठेवली आहे, असे सांगत खुद्द शरद पवार यांनाच या कारखान्याचा कारभारी बदलायचा असल्याचेे सांगितले.

यावेळी गणेश पाटील, दीपक पवार, अमरजित पाटील, विलास साळुंखे, नारायण जाधव, दिलीप रणदिवे, सागर यादव, दीपक वाडदेकर, दगडू हाके, हनुमंत पवार, माणिक बाबर, रमाकांत पाटील, माजी संचालक तानाजी चव्हाण, रामदास चव्हाण, छगन चव्हाण, तात्यासाहेब नागटिळक, गणेश चव्हाण आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news