कलिंगडाने मिळवा उजळ त्वचा

कलिंगडाने मिळवा उजळ त्वचा

त्वचेची काळजी प्रत्येक मोसमात द्यावीच लागते. बहुतांश वेळा रसायनयुक्त क्रीम, सौंदर्यप्रसाधने यांचा वापर करूनही त्वचेचे सौंदर्य खुलण्यासाठी फारसा फायदा होत नाही. तुमच्याबाबतही असे घडले असेल तर एकदा कलिंगडाचा वापर करून पहा.

कलिंगड हे पाणीदार आणि पाणीयुक्त असलेले फळ आहे. त्यात लाइकोपीन नावाचे अँटिऑक्सिडंट असते. त्यामुळे खराब झालेली त्वचा दुरुस्त करण्याचे काम होते. त्वचेची अँटिऑक्सिडंटची कमतरता पूर्ण करण्यासही कलिंगड उपयुक्त ठरते. त्यामुळे त्वचेचा पोत चांगला होतो, शिवाय ती एक्सफॉलिएट होते. कलिंगडापासून बनवलेले फेसपॅक सूर्यप्रकाशातील हानिकारक किरणांपासून त्वचेचा बचाव करतात. तसेच त्वचा मॉश्चराईज करतात. कलिंगड त्वचेसाठी खूप चांगले आहे. घरच्या घरी कलिंगडाचे फेस पॅक्स तयार करता येतात.

घरगुती पॅक

• एक चमचा कलिंगडाच्या रसात एक चमचा साधे ग्रीक योगर्ट मिसळावे. हा मास्क चेहरा आणि मानेवर १० मिनिटे लावून ठेवावा. दह्यातील लॅक्टिक अॅसिड आणि एन्झाईम्समुळे त्वचा एक्सफॉलिएट होते. तसेच त्वचेला मॉश्चरायझरचे फायदे मिळतात.
• एक चमचा कलिंगडाचा रस घेऊन त्यात अव्हाकॅडो पल्प मिसळावा. हा मास्क चेहऱ्यावर २० मिनिटे ठेवावा. मग कोमट पाण्याने चेहरा धुवावा. अँटी एजिंगसाठी हा पॅक उत्तम ठरतो.
• कलिंगडाचा रस एका बाटली भरून ती फ्रीजमध्ये ठेवावी. थंड झाल्यावर कलिंगडाच्या रसात कापसाचा बोळा बुडवावा आणि तो चेहऱ्यावर लावावा. या नैसर्गिक टोनरमध्ये गुलाबपाणी आणि तुळशीच्या रसाचे काही थेंब मिसळावेत. असे केल्याने चेहरा उजळतो.
• स्पामध्ये कलिंगडाचा रस आणि इसेन्शिअल तेलाने चेहऱ्यावर मसाज केला जातो. त्यानंतर चेहऱ्याला फेस मास्क लावला जातो. जीवनसत्त्वांनी युक्त कलिंगडाचा मास्क त्वचेचे सनबर्नपासून संरक्षण करतो. कलिंगडाचा वापर करून केल्या जाणाऱ्या फूल बॉडी मसाजमुळे त्वचेचे रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.
-वर्षा शुक्ल

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news