औरंगाबाद : वैजापुरात दुचाकीच्या धडकेत वृद्ध ठार

औरंगाबाद : वैजापुरात दुचाकीच्या धडकेत वृद्ध ठार

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : मोटारसायकलने धडक दिल्याने वृद्ध व्यक्ती ठार झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास शहरातील येवला रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्राजवळ घडली. कुशाबा विठ्ठल गावडे (80 रा. येवला रोड, वैजापूर ) असे या अपघातातील मृताचे नाव आहे.

कुशाबा गावडे हे रानात शेळ्या घेऊन चारण्यासाठी गेले होते. सायंकाळी घराकडे परतत असताना त्यांना मोटारसायकलने पाठीमागून धडक दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. अपघात झाल्यानंतर मोटारसायकल चालक फरार झाला.

याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कुशाबा यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी असा परिवार आहे .पोलिस याप्रकरणी मोटारसायकल चालकाचा शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news