औरंगाबाद : प्रियकरासोबतचे फोटो पतीला पाठवून बदनामी

crime
crime
Published on
Updated on

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा: लग्नापूर्वी प्रियकरासोबत काढलेले महिलेचे फोटो तिच्या पतीला मेल व व्हॉटसअपवरून पाठवून महिलेची बदनामी करणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार सुकलाल साबणे असे आरोपीचे नाव आहे.

घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज महानगर परिसरात राहणार्‍या 25 वर्षीय अनिता (नाव बदलेले आहे) चे लग्न गत वर्षी झाले आहे. लग् नापूर्वी पदवीचे शिक्षण घेत असताना तिची ओळख परमेश् वर(नाव बदलेले आहे) या तरुणासोबत झाली होती. दरम्यान मैत्रीचे रूपातंर प्रेमात झाले.

परमेश्वर ज्या संस्थेत लिपिक म्हणून नोकरीला होता, त्याच संस्थेत 2016 मध्ये अनिताला लिपिक म्हणून नोकरी लागली. दरम्यान, परमेश् वर व अनिता हे दोघे प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यानतंर दोघांनी एकमेकांसोबत फोटो काढले होते. काही दिवसांनंतर परमेश्वर याचे लग्न जमल्याने अनिताने दोघांचे फोटो डिलीट करू असे परमेश्वर यास सांगितल्याने दोघांनी त्यांच्याकडील फोटो डिलीट केले होते.

2018 मध्ये परमेश्वर याचे तर गत वर्षी अनिताचे लग्न झाले. लग्नाअगोदर परमेश्वर या तरुणासोबत आपले प्रेमसंबध असल्याचे अनिताने तिच्या होणार्‍या पतीला सांगितले. त्यानेही भूतकाळ म्हणून तो विषय सोडून अनितासोबत लग्न केले. लग्नानतंर अनिता पतीसोबत पुण्याला राहण्यासाठी गेली होती. त्यानंतर 10 मार्च 2022 रोजी अनिता माहेरी असताना तिच्या पतीने अनिताला फोन करून त्याच्या मेलवर तसेच व्हॉटसअप वर कोणीतरी तुझे परमेश्वरसोबत असलेले फोटो पाठविल्याचे सांगितल्याने अनिताने औरंगाबाद येथील सायबर पोलिस ठाण्यात याविषयी तक्रार दिली होती.

पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या चौकशीत अनिताच्या पतीला ज्या मेल आयडीवरून फोटो पाठविण्यात आले, त्या मेल आयडीचा वापरकर्ता तुषार सुकलाल साबणे असल्याचे समोर आले. या प्रकरणी अनिताने 23 ऑगस्ट रोजी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तुषार साबणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक श्यामकांत पाटील हे करीत .

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news