Uncategorized
औरंगाबाद : पैशावरून बाप लेकाला मारहाण
औरंगाबाद : उधारीच्या पैशावरून दोघांनी बाप लेकाला मारहाण केल्याची घटना हर्सूल परिसरातील फातेमा नगरात घडली. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारेक अनवर (22), शौकत सय्यद (35) रा. फातिमानगर अशी आरोपींची नावे आहेत.
सय्यद मुद्देशीर कामील काझी (रा. फातिमानगर) यांनी दिलेल्या तक्ररीत म्हटले की मारहाण करणारे शेजारी राहतात. उधारीचे 8 हजार रुपये का दिले नाही, या कारणांवरून मला व वडिलांना शारेक याने लाकडी काठीने मारहाण केली. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

