

कुंभारी : पुढारी वृत्तसेवा सर्वोच्च न्यायालयाने निर्देशानुसार ओबीसीची माहिती संकलित करण्यासाठी बांटिया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोगाच्या मार्फत गठित केला आहे. त्यानुसार ओबीसींची माहिती सॉफ्टवेअरद्वारे आडनावानुसार संकलित न करता जातीनिहाय संकलित करण्यात यावी. या मागणीचे निवेदन सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बळीराम काका साठे, ओबीसी सेलचे अध्यक्ष अविनास मार्तंडे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष बिपिन करजोळे, ओबीसी सेल जिल्हा महिला अध्यक्ष राऊत, आप्पाराव कोरे उपस्थित होते. एक आडनाव अनेक जाती प्रवर्गात येते प्रत्येक जाती वर्गातील व्यक्तींची नावे घेताना किमान एक व्यक्तीचे जन्मदाखला, एलसी चेक करून माहिती घ्यावी. आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचे अपेक्षित असलेले एम्पिरिकल डाटा दररोज जाऊन ओबीसींचे खरी आर्थिक सामाजिक राजकीय स्थिती माहिती संकलन अपेक्षित होते.
परंतु, असे कुठेही निदर्शनास येत नाही. आयोग वरीलप्रमाणे माहिती संकलित न करता सॉफ्टवेअरद्वारे आडनावानुसार सदोष पद्धतीने माहिती संकलित करीत आहेत अशाप्रकारे समस्त ओबीसी समाजाची फसवणूक होत आहे. ओबीसीचे कायमस्वरूपी कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे.