उजनी प्रकल्पांतर्गत पुनर्वसित गावठाणांसाठी 2 कोटी 20 लाख

उजनी प्रकल्पांतर्गत पुनर्वसित गावठाणांसाठी 2 कोटी 20 लाख

Published on

करमाळा : पुढारी वृत्तसेवाउजनी प्रकल्पांतर्गत मौजे वांगी एक खातगाव नंबर दोन, सोगाव पश्‍चिम, रिटेवाडी, वांगी नंबर 2 व कविटगाव या पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधा कामांसाठी 2 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती करमाळा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

वांगी नंबर 1 येथे सिमेंट काँक्रीट गटार बांधणे या कामासाठी 16 लाख 8 हजार 688 रुपये, खातगाव नंबर 2 येथे सिमेंट काँक्रीट गटार बांधण्यासाठी 25 लाख 59 हजार 95 रुपये, पोमलवाडी येथे सिमेंट काँक्रीट गटार बांधण्यासाठी 43 लाख 98 हजार 280 रुपये तसेच पोमलवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी 13 लाख 63 हजार 595 रुपये, सोगाव पश्‍चिम येथे अंतर्गत खडीकरण कामासाठी 34 लाख 85 हजार 49 रुपये, रिटेवाडी येथे अंतर्गत खडीकरण कामासाठी 15 लाख 3 हजार 928 रुपये, वांगी नंबर 2 येथे सिमेंट काँक्रीट गटार बांधकामासाठी 17 लाख 2 हजार 539 रुपये, कविटगाव येथे स्मशानभूमी पोहोच रस्ता व अंतर्गत खडीकरण कामासाठी 53 लाख 48 हजार 832 रुपये असा एकूण 2 कोटी 19 लाख 70 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

29 जुलै 2022 च्या शासन निर्णयानुसार या कामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळालेली असून पुनर्वसित गावठाणांमधील प्रलंबित कामांसाठी हा निधी उपयुक्त असल्यामुळे या भागातील प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. आमदार संजयमामा शिंदे यांनी या गावांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल या गावातील ग्रामस्थांकडून आमदार संजयमामा शिंदे यांचे आभार मानले जात आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news