हाय फ्रेंडस,
सकाळी उठल्यावर ज्यावेळी तुम्ही तुम्ही तुमचा डाटा ऑन करता त्यावेळी किती मेसेजेस तुमच्या व्हॉटस्अपर पडलेले असतात. पाचशे, हजार, दोन हजार, तीन हजार? किती? जर यापेक्षाही जास्त पडत असतील तर तुम्ही नक्कीच सर्वात फेमस पर्सनॅलिटी, टॅलेंटेड, हँण्डसम, कर्तृत्ववान, मैत्रिला जागणारे, मनमिळावू, सुस्वभावी आहात असे स्वत:ला मुळीच समजू नका. कारण अशा पोस्टचा ढिग कोणाच्याही व्हॉटस्अपवर कितीही वेळा पडतो. स्पेशल डे, बर्थडे, स्पेशल मंथ, जयंती, पुण्यतिथी, सण, उत्सव असेल तर इतकं सोशलाईज व्हायला होतं या व्हॉटस्अपियन्सना ना की पुछो मत. या विश ढिगाला वैतागून आता युजर्स ऑल पोस्टऑल क्लिअर करतात.
फ्रेंडस्, मानव हा समाजशिल, उत्सवप्रिय आहे हे खरेच आहे. परंतु सोशल मिडीयामुळे मानव नको इतका समाजशिल होत चालला आहे. समाजाच्या जवळ जातोय, एकत्रिकरण होतेय असे नाही बरं का. तर एकमेकांना शुभेच्छा पाठवायला एवढा उत्सुक झाला आहे की, इतर कोणाकडून आलेले फुलांचे गुच्छ, केक, गुढ्या, तोरणे कितीवेळा पाठवताय याचे भान कोणालाच राहिलेले नाही. त्यामुळेच मग एखाद्याला श्रध्दांजली वाहतानाही हॅपी केक संबंधितांच्या व्हॉटस्अपवर जाऊन पडतात. या फॉरवर्डेड मेसेजेसला लोक आता इतके कंटाळले आहेत की 'असे मेसेसेच पाठवले तर ब्लॉक केले जाईल'असा दमच काहीजण भरतात. तर कोणी 'कृपया फॉरवर्डेड मेसेजेस पाठवू नयेत' अशी पोस्टही टाकतात. पण ऐकतील ते व्हॉटसअपीयन्स कसले!
बरं जे तुम्ही पाठवत आहात ते खूप वेगळं, आकर्षक असं असतंच असं नसतं. कारण नेटवर क्रिएटिव्हीटी करण्यासाठी खूप बुध्दीमान वगैरे असण्याची गरज नसते. फ्रेंडस, तुमच्या व्हॉटस्अपवर जेवढे मेसेजेस पडत असतात त्यातील किती मेसेजेस तुम्ही पुर्णपणे वाचता (किती वाचनीय असतात), की ऑल क्लिअर करून टाकता. तोच तोचपणाला माणूस कंटाळतो हा नियम इथेही लागू होणारच की. अगदी विचार करायचा झाला तर तुम्हाला येणार्या मेसेजेसमध्ये किती मेसेजेस खास तुमच्यासाठी असतात? त्यामध्ये खरोखरच किती इमोशन्स असतात? मनापासून त्या शुभेच्छा दिलेल्या असतात का? या प्रश्नांची उत्तरे शोधा. आणि असा फॉरवर्डेड कचरा इकडून तिकडे फेकण्यापेक्षा ज्या व्यक्तिला तुम्हाला अगदी 'दिलसे' विश करायचे आहे त्या व्यक्तिला कॉल करा अथवा समक्ष भेटा यामध्ये तुम्हाला आणि त्या व्यक्तिला किती समाधान मिळते ते अनुभवा. समक्ष भेटून विश केल्यानंतर जो आनंद मिळतो तो अशा कृत्रिम विशमधून मिळतो का?
– प्रतिभा राजे
Tags : whatspaap, users, post, clear,