मुंबईकरांचे रविवारी मेगाहाल | पुढारी

मुंबई : प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर लाईनसह पश्‍चिम रेल्वेने रविवारी ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांचे रविवारी मेगाहाल होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा दरम्यान अप फास्ट लाईनवर आणि पनवेल-वाशी दरम्यान अप आणि डाऊन हार्बर लाईनवर सकाळी 11.30 ते सायंकाळी 4 या वेळेत रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्‍चिम रेल्वेच्या सांताक्रुज आणि गोरेगाव स्थानकादरम्यान रविवारी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या वेळेत जम्बोब्लॉक असेल.

मरे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मेन लाईवर सकाळी 10.37 ते दुपारी 3.06 य वेळेत कल्याणहून सुटणार्‍या अप फास्ट लाईवरील सर्व लोकल दिवा ते परळ स्थानकांदरम्यान अप स्लो लाईनवर धावतील व सर्व स्थानकांवर थांबा घेतील. तसेच ठरलेल्या स्थानकांवर 20 मिनिटे उशीराने पोहचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणार्‍या डाऊन फास्ट व सेमी फास्ट लाईनवरील लोकल  सकाळी 10.05 ते दुपारी 3.22 या वेळेत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकांवर थांबा घेतील. तसेच ठरलेल्या स्थानकांवर 20 मिनिटे उशीराने पोहचतील. सीएसएमटीहून सुटणार्‍या आणि सीएसएमटीला पोहचणार्‍या सर्व लोकल सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत 10 मिनिटे उशीराने धावतील.

पनवेल व बेलापूरहून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर लाईनवरील लोकल सेवा सकाळी 11.06 ते सायंकाळी 4.01 या वेळेत, तर सीएसएमटीहून बेलापूर व पनवेलसाठी सुटणारी डाऊन हार्बर लाईन सेवा सकाळी 10.03 ते दुपारी 3.16 या वेळेत पूर्णपणे बंद असेल. तसेच पनवेल व बेलापूरहून ठाणे स्थानकासाठी सुटणारी अप ट्रान्स हार्बर लाईन सेवा सकाळी 10.12 ते दुपारी 3.53 या वेळेत, तर ठाण्याहून पनवेलसाठी सुटणारी डाऊन ट्रान्स हार्बर सेवा सकाळी 11.14 ते दुपारी 3.20 या वेळेत बंद असेल. नेरूळहून खारकोपरसाठी सुटणारी हार्बर लाईनची सेवाही सकाळी 11.45 ते दुपारी 2.45 या वेळेत, तर खारकोपरहून नेरूळसाठी सुटणारी सेवा सकाळी 12.15 ते दुपारी 3.15 या वेळेत बंद ठेवण्यात आली आहे. मेगाब्लॉक काळात पनवेल-अंधेरी आणि ठाणे-वाशी-नेरूळ लोकल सेवाही बंद असेल. मात्र प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेलापूर-खारकोपर लोकल सेवा सुरू ठेवण्यात आली असून सीएसएमटी आणि वाशी दरम्यान विशेष लोकल चालवली जाईल.

पश्‍चिम रेल्वे रविवारी स्लो लाईनवर चालणार

प ट्रॅक, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड कामांसाठी पश्‍चिम रेल्वेने रविवारी सांताक्रुज आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. अप आणि डाऊन फास्ट लाईनवर जम्बो ब्लॉकचा परिणाम होणार असल्याने या काळात सर्व फास्ट लोकल स्लो लाईनवर चालवण्यात येतील. परिणामी, काही लोकल रद्द होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

दादर-रत्नागिरी ही गाडी दिव्याहून सुटणार

प मेगाब्लॉक काळात रत्नागिरी-दादर ही गाडी दिवा स्थानकापर्यंतच धावेल. तसेच दादर-रत्नागिरी गाडी दिवा स्थानकाहून सुटेल. या गाडीने प्रवास करणार्‍या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दादरवरून दिवा स्थानकासाठी दुपारी 3.40 वाजता विशेष लोकल सुटेल. ही विशेष लोकल सायंकाळी 4.06 वाजता ठाणे, तर सायंकाळी 4.13 वाजता दिवा स्थानकावर पोहचेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news