परळी (सातारा); पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मान्सूनचे धमाकेदार आगमन झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत बरसत असल्याने काही ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच ओढे नाले, धबधबे ओसंडून वाहू लागल्याने धरण क्षेत्रातही पाण्याची चांगलीच आवक वाढली आहे. उरमोडीतही मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणाचे चारही वक्र दरवाज्या मधून विसर्ग उरमोडी नदी पात्रात सोडण्यात आला आहे.
अधिक वाचा : कोयनेच्या पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग सुरू
परळी खोऱ्यात पावसाने संततधार सुरु ठेवल्याने उरमोडी धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने गुरुवार १७ जून रोजी रात्री ११ वाजता चारही वक्रद्वार ०.२५ मी उचलून ७५० व विद्युत गृह २०० असा एकूण ९५० क्यूसेक विसर्ग उरमोडी नदी पात्रात सुरू करण्यात आला.
अधिक वाचा : सातारा जिल्ह्यातील धरणांत ५१ टीएमसी पाणी
तसेच पावसाचा मारा कायम असल्याने पाणी पातळी मध्ये वाढ होत असल्याने शुक्रवार १८ जून रोजी सकाळी ९ वाजता वक्रद्वार क्र १ व ४ हे ०.२५ मी वरून ०.५० मी करण्यात आली. सध्या उरमोडी नदी पात्रात होत असलेला एकूण विसर्ग १४१३ क्यूसेक, कालवा १०० क्यूसेक. धरणातून होत असलेला एकूण विसर्ग १५१३ क्यूसेक इतका असून याकालावधीत उरमोडी नदीपात्रातून ये-जा करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.