उमरखेड; पुढारी वृत्तसेवा: विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीवरील सहस्रकुंड धबधबा पहिल्याच पावसात ओसंडून वाहत आहे. धबधब्याचे हे नयनरम्य सौंदर्याचे अप्रतिम लेणे पाहण्यासाठी, हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी, या निसर्गरम्य पर्यटनस्थळी आत्तापासूनच पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.
अधिक वाचा : अमेरिकेतील 'हे' आहे भूताचं गाव; जिथं फक्त ७ लोक राहतात!
उंच टेकड्यांवर निसर्गाच्या कुशीत असलेल्या या धबधब्याचे विहंगम दृश्य नेहमीच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करीत आले आहे. यंदा सुरवातीपासूनच पैनगंगेच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत आहे. यामुळे पैनगंगा नदीसुद्धा दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे सहाजिकच सहस्त्रकुंड धबधबा सहस्त्रधारांनी प्रवाहित झाला आहे.