मुंबई: पुढारी ऑनलाईन
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके सापडल्याप्रकरणी अटकेत असलेला निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला पुन्हा पोलिस दलात घ्यावे, यासाठी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा प्रयत्नशील होते. यासाठी त्यांनी भाजपच्या आमदार आणि प्रमुख नेत्याकडून प्रयत्न केले होते, अशी माहिती समोर आली आहे.
परमबीर सिंग यांचीही चौकशी होणार; राज्य सरकारने दिली परवानगी
मुंबई विमानतळाजवळील हॉटेल लीला येथे गुन्हे शाखेचे तत्कालीन अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट बैठकीला आले होते. त्यांनी या भाजप नेत्याजवळ सचिन वाझे याला पुन्हा पोलीस सेवेत घेण्याबाबत विनंती केली. तशी विनंती सरकारला केली असली तरी तत्कालिन भाजप सरकारने त्याला विरोध केला होता.
वाचा : लॉकडाऊनचा दोन दिवसांत निर्णय, आज टास्क फोर्सची बैठक
प्रदीप शर्माचा हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर शिवसेनेकडून वाझेला पोलीस दलात घेण्यासाठी थेट संपर्क साधला होता. मात्र वाझेवर गुन्हा दाखल असून कोर्टात सुनावणी सुरू आहे, असे सांगून शिफारस नाकारली. सध्या 'एनआयए'च्या रडारवर प्रदीप शर्मा असून, त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न करत आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके ही शर्मा यानेच दिली असल्याचा संशय आहे.
वाचा : वीकेंड लॉकडाऊनने मुंबईत थांबली ५० हजार कोटींची उलाढाल
प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे सुरुवातीच्या काळात एकत्र काम करत होते. २००४ मध्ये ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित झाल्यानंतर सचिन वाझे याने २००७ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. तर २०१९ मध्ये राजीनामा देत प्रदीप शर्माने शिवसेनेत प्रवेश घेऊन नालासोपाऱ्यातून आमदारकीची निवडणूक लढवली होती. शिवसेना सत्तेत आल्यानंतर निलंबित सचिन वाझेला पुन्हा पोलीस सेवेत घेण्यात आले होते.
वाचा : कोरोनाच्या संकटात केंद्र अन् राज्याकडूनही आर्थिक राजधानी मुंबईची घोर उपेक्षा