सिडको अध्यक्ष कोण? | पुढारी

Published on
Updated on

नवी मुंबई : पुढारी वृतसेवा

सिडको श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना वसाहत, मेट्रो, उरण नेरुळ रेल्वे, जेएनपीटी विस्तार, स्मार्ट सिटी यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याच्या कामी सिडको लागली आहे. पालघर शहर उभे करण्याची जबाबदारी सिडकोवर आहे. यामुळे या महामंडळावर राष्ट्रवादीने दावा केल्याने सिडको राष्ट्रवादीकडे जाण्याची चिन्हे आहेत. आता सिडकोच्या अध्यक्ष पदासाठी माजी आमदार सुरेश लाड यांचे नाव आघाडीवर असून त्यावर एकमत होईल अशीही शक्यता आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा सुरेश लाड यांच्या  नियुक्‍तीला विरोध नसल्याचे समजते, तर पनवेल आणि उरण, नवी मुंबईत या भागात राष्ट्रवादीची ताकद नसल्याने सुरेश लाड यांना सिडको अध्यक्ष करून या भागात पक्षाला ताकद देण्याची रणनीती आहे. तसेच लाड यांचा पक्ष संघटनेचा  अनुभव लक्षात घेता त्यांना जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

सुरेश लाड विरुद्ध आमदार  महेंद्र थोरवे असा राजकीय संघर्ष सध्या कर्जतमध्ये सुरू आहे. आमदार थोरवे यांनी रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यामुळे खासदार सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नोंद घेतल्याची समजते. तटकरे आणि अजित पवार हे लाड यांना राजकीय ताकद देण्याकरिता त्यांची सिडकोवर वर्णी लागावी, यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

नवी मुंबई येथील शिवसेनेचे नेते नामदेव भगत यांनी सिडको संचालकपद मिळण्याकरिता जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे तेसुद्धा आपली वर्णी लागावी यासाठी जोरदार प्रत्यन करताना दिसून येत आहेत. राष्ट्रवादीचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील यांच्या नावाचीही सिडको अध्यक्षपदासाठी चर्चा आहे. तर आगरी समाजाचे भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते तसेच गणेश नाईक यांना उत्तर देण्याकरिता पाटील यांच्या नावाचीही चर्चा सध्या सुरू आहे. 15 जूनपर्यंत महामंडळ नियुक्त होण्याची शक्यता असून आघाडी सरकार भक्कम आहे, असा संदेश देण्याकरिता ही नियुक्‍ती केली जाईल.

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news