

रत्नागिरी पुढारी वृत्तसेवा : खासदार सुप्रिया सुळे म्हणतात, सोमय्यांना छापे पडणार आहेत हे आधीच कसे कळते; तर त्यांना आताच सांगतो, पुढील आठवड्यात आणखी तीन मंत्र्यांवर छापे पडणार आहेत, असे किरीट सोमय्या यांनी दापोलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
त्याचबरोरब डर्टी डझन्सवर कारवाई होणार म्हणजे होणारच. याबाबत आपण ठाम असल्याचेही ते म्हणाले. अनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट आपण तोडून दाखवूच. तुम्ही ते वाचवून दाखवा, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे.
यावेळी त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावरही आरोप केले. अनिल परब, अजित पवार, हसन मुश्रीफ यांना कोणतं सर्टिफिकेट हवं आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एकेक माफियाला जेलमध्ये जावे लागणार असल्याचे ते म्हणाले.