उत्तूर : पुढारी वृत्तसेवा
मुम्मेवाडी (ता. आजरा ) येथील कै. मुकुंदरावदादा आपटे फाऊंडेशनच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटरला जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट दिली. यावेळी जि. प. सदस्य उमेश आपटे यांच्याकडून कोव्हिड सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्णांची विचारपूस करण्याबरोबरच परिस्थितीची माहिती घेतली.
नागरिकांनी कोरोनाबाबतच्या शासकीय नियमावलीचे पालन करून या रोगाचा फैलाव टाळावा व शासकीय यंत्रणेला योग्य सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, गटविकास अधिकारी बी.डी. वाघ, सहा. फौजदार बी. एस. कोचरगी व निरंजन जाधव उपस्थित होते.