नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि. २२) दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. त्यांनी २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. पवारांच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. शरद पवार घेत असलेली बैठक सर्व विरोधी पक्षांची बैठक असल्याचे मला काही वाटत नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.
वाचा : सरनाईकांच्या पत्रावरून शिवसेना संतापली; आमदारांना 'विनाकारण त्रास' का?
शरद पवार आज राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांची भेट घेणार आहेत. ते एक मोठे नेते असून अनेकजण राजकारण, अर्थव्यवस्थेबाबत त्यांचा सल्ला घेतात. त्यामुळे ही बैठक विरोधी पक्षांची बैठक असल्याचे मी म्हणणार नाही. कारण समाजवादी, बसपा, वायएसआर काँग्रेस पार्टी, टीडीपी, टीआरएस आदी पक्ष या बैठकीत असणार नाहीत, असा राऊत यांनी नमूद केले आहे.
गेल्या काही दिवसांत शरद पवार यांनी राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची दोन वेळा भेट घेतली आहे. तिसऱ्या आघाडीसाठी शरद पवारांच्या हालचाली सुरु आहेत. त्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आज १५ विरोधी पक्षाची बैठक होत आहे. या बैठकीतून काँग्रेसला वगळण्यात आले आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात संयुक्तरित्या एक प्रभावी चेहरा देण्यासंबंधी रणनीती तयार करीत असल्याचे बोलले जात आहे.
वाचा : 'तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला यशस्वीपणे आव्हान देऊ शकेल याची खात्री नाही'