सानपाड्यातील मुलीचे अपहरण उधळले; तीन तासांत शोध

नवी मुंबई : प्रतिनिधी

भावाबरोबर देवदर्शनासाठी आलेल्या एका 15 वर्षीय मुलीचे चार मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणांनी अपहरण केल्याची घटना सानपाडा येथील सेक्टर 14 मधील बुद्धेशर मंदिराजवळ शुक्रवारी सायंकाळी घडली. दरम्यान, 3 तासांनी पोलिसांनी या मुलीचा शोध लावला. त्यावेळी ती बेशुद्धावस्थेत होती. तिला वैद्यकीय तपासणीसाठी महापालिका रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.

होळीच्या रंगांनी चेहरे माखलेल्या या अपहरणकर्त्यांनी या मुलीच्या भावाला जोरदार धक्‍का मारून त्याला खाली पाडले आणि या मुलीला पांढर्‍या मारुती ओमिनीमध्ये कोंबून गाडी पामबिचच्या बाजूने सुसाट नेली. दिवसाढवळ्या भरवर्दळीच्या भागात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

सानापाडा येथे चौरंग हौसिंग सोसायटी, प्लॉट नं. 16 येथे राहणारी 14 वर्षीय यामिनी राजपुरोहित ही मुलगी आपल्या भावाबरोबर सायंकाळी साडेसहा वाजता बुद्धेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी निघाली होती. दोघेही मंदिराच्या जवळ असताना तेथे पांढरी मारुती ओमिनी कार आली. चार तरुण या गाडीतून खाली उतरले. त्यांचे चेहरे होळीच्या रंगांनी पूर्णपणे माखले होते. त्यांनी या मुलीच्या भावाला जोरदार धक्‍का देऊन खाली पाडले आणि या मुलीला जबरदस्तीने उचलून गाडीत कोंबले. त्यानंतर अपहरणकर्ते या मुलीसह पामबिचच्या दिशेने वेगात निघून गेले. 

अपहरणकर्त्या तरुणांचा शोध घेण्यात येत असून रायगड, ठाणे, नवी मुंबई पोलिसांना सतर्क करतानाच नवी मुंबईतून जाणार्‍या सर्व मार्गांची सीसीटीव्ही फुटेज तपासणी गुन्हे अन्वेषण विभागाने हाती घेतली आहे.
 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news