कुपवाड (सांगली) : पुढारी वृत्तसेवा
सांगली जिल्ह्यातील सावळी (ता.मिरज) येथील हरी ओम फूड प्रोडक्ट्स या फरसाणा व बेकरी उत्पादन कंपनीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीत कच्चा व तयार झालेला माल तसेच मशिनरी यांचे अंदाजे ७० लाखांचे नुकसान झाले. सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासांच्या आत आग आटोक्यात आणली. ही माहिती कंपनीचे मालक सुरेश गजानन माळी यांनी दिली.
अधिक वाचा : जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी ई-पास सक्ती
सावळीत सुरेश माळी यांची हरी ओम फूड प्रोडक्ट्स या नावाची फरसाणा कंपनी आहे. शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कंपनीतून धूर बाहेर येत असल्याचे रखवालदाराच्या निर्दशनास आले त्यांनी तातडीने ही माहिती मालकांना दिली. माळी यांनी आगीची माहिती महापालिका अग्निशमन विभागाला फोनवरून दिली.
अधिक वाचा : जगात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८८ टक्के!
अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन वाहनांच्या मदतीने तीन तासांच्या आत आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत कच्चा व तयार झालेला फरसाणा तसेच बेकरी उत्पादन व मशिनरी यांचे अंदाजे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली आहे.