कोल्हापूर : प्रतिनिधी
आरोग्य हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय! हल्ली इंटरनेटच्या विश्वात आपल्या आजूबाजूला भरपूर माहिती असूनही अनेकजण आरोग्य व्यायाम आणि वाढते वजन याबाबत कायम साशंक असतात. यासाठीच दै. 'पुढारी' कस्तुरी क्लबच्या वतीने झुम्बा, मेडिटेशन आणि फेस योगा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. टोमॅटो एफ. एम. कार्यालय येथे संपन्न झालेल्या कार्यशाळेला महिला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
झुम्बा कार्यशाळेमध्ये नाचत व्यायाम हा मंत्र जपणारी ही कला शिकण्याची संधी कलादीक्षा अॅकॅडमीचे स्टिव्हन पावलस यांच्यामुळे प्राप्त झाली. नृत्याची कुठलीही पार्श्वभूमी नसली तरी, झोकात झुम्बा डान्स करण्याचा आनंद महिलांनी घेतला. तसेच, रिलॅक्सेशन, फेस योगा तसेच मानसिक आरोग्य, ताणतणाव टाळण्यासाठीचे मेडिटेशनही शिकायला मिळाले.
चेहर्यावरील काळे डाग, सुरकुत्या, चेहर्यावरील तणाव यासह इतर समस्यांवर त्यांनी उपायही सुचवले. कार्यशाळेत फिटनेस फंडा आणि डान्स फिव्हर एकाच मंचावर आणत सदरची कार्यशाळा विशेष उपयुक्त ठरली.
कस्तुरी क्लब सदस्य नोंदणीस आता मोजकेच दिवस शिल्लक
कस्तुरी क्लब सभासद नोंदणी अंतिम टप्प्यात आली आहे. सभासद नोंदणी शुल्क 600 रुपये असून, सभासद झाल्यावर लगेचच 1499 रु.ची सूर्या कंपनीची सिंगल बर्नर शेगडी मोफत मिळेल. याव्यतिरिक्त अग्रवाल गोल्ड आणि सिल्व्हर यांच्याकडून गोल्ड प्लेटेड छोटे मंगळसूत्र मिळेल. याकरिता टोमॅटो एफ. एम. कार्यालय, वसंत प्लाझा, 5 वा मजला, बागल चौक येथे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 8805007724/8805024242/9404684114.