मठाधिपती महाराजाने अनैतिक संबंधातून केला एकाचा खून 

Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वाल्हेकरवाडी येथील एका मठाधिपती असलेल्या महाराजाने अनैतिक संबंधातून एकाचा खून केला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह कात्रज घाटात टाकून अपघाताचा बनाव देखील रचला. मात्र भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्ह्याचा बारा तासाच्या आत छडा लावत महाराजासह चौघांना बेड्या ठोकल्या. आनंद गुजर (44,रा.आकुर्डी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 

याप्रकरणी महाराज रमेश कुंभार आणि मठात काम करणारे यश निकम, अशोक बडगाम आणी आनंद यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. लाकडी दांडके व लोखंडी रॉडने हा खून करण्यात आला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. आरोपी महिला ही गुजर यांची दुसरी पत्नी आहे. तर तिचे देखील हे दुसरे लग्न आहे. मागील काही दिवसापासून ती महाराज कुंभार याच्या सोबत वास्तव्यास होती. मालमत्तेच्या वादातून हा खून झाला असल्याचे पोलिसांचे म्हणने आहे. 

पोलिसांनी सकाळी नागरिकांनी फोन करुन कात्रज नव्या घाटातील हॉटेल मराठी शाही समोर एक व्यक्ती बेवारस अवस्थेत मृत पडल्याची खबर दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, संबंधीत मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. दरम्यान मृतदेहाजवळ एक ज्युपिटर दुचाकी पोलिसांना आढळली. तीचा नंबर तपासला असता, तो बनावट आढळला. यानंतर पोलिसांनी चॅसी नंबरवरुन गाडी मालकाचा शोध लावला. ही गाडी आनंद गुजर याची असल्याचे उघड झाले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला. पोलिसांनी केलेल्या तपासात गुजर याची पत्नी मागील सहा महिण्यापासून महाराजांच्या मठात रहात होती. यावरुन गुजर हा शुक्रवारी सायंकाळी मठामध्ये गेला. तेथे त्याची पत्नी व महाराजांबरोबर भांडणे झाली. या भांडणात महाराज, पत्नी व महाराजांच्या सेवेकर्‍यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत आनंद याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट महाराजाने आखला. त्याचा मृतदेह ब्रीझा गाडीमध्ये टाकण्यात आला. तर तो आलेल्या ज्युपिटर स्कुटरचा नंबर बदलून तीही ब्रीझा पाठोपाठ एक भक्त घेऊन आला. त्यांनी आंनदचा मृतदेह कात्रज नव्या घाटातील मराठे शाही हॉटेलसमोर टाकला. त्याच्या शेजारीच स्कुटर ठेवण्यात आली.जेणेकरुन त्याचा वाहनाने उडवल्याने मृत्यू झाल्याचा भास होईल.

आनंद गुजर याच्या पत्नीच्या नावावर आयडीया कंपनीची एजंन्सी आहे. तीने महाराजांना एक ब्रीझा कारही भेट दिली आहे. तर आनंद गुजर सध्या कोणताही कामधंदा करत नव्हता. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर काही तासातच आरोपींना अटक करण्यात आल्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक  कळसकर यांनी दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, गुन्हे निरीक्षक प्रकाश पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे, कर्मचारी पी.सी गायकावाड, सचिन पवार, रविंद्र चिप्पा, विक्रम सावंत गणेश शेंडे, सतीश खेडकर, रविंद्र भोसले यांच्या पथकाने केली. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news