पुणे : ‘हॅट्ट्रिक साजरी करणार; शहरातील आठही जागा जिंकू’ 

Published on
Updated on

पुणे : प्रतिनिधी         

पर्वती विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन हॅट्ट्रिक साजरी करणार असल्याच्या विश्वास भाजप शहराध्यक्षा आणि महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केला. विकासकामांच्या जोरावर शहरातील सर्व आठही जागा भरघोस मतांनी विजयी होतील असेही त्या म्हणाल्या.    

मिसाळ यांचा उमेदवारी अर्ज भरताना खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजपचे नेते योगेश गोगावले, शिवसेनेचे बाळा ओसवाल, संजय मोरे, अशोक हरणावळ यांच्यासह भाजपचे बहुतांशी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मिसाळ पुढे म्हणाल्या, मागील दहा वर्षांमध्ये पर्वती मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे नुकतेच टेंडर मंजूर झाले आहे. त्याचे काम निवडणुकीनंतर सुरू होईल. एचसीएमटीआर या बहुचर्चित रिंगरोड मतदार संघातून जातोय. या रस्त्याच्या कामाच्या निविदा आलेल्या आहेत. हे कामही लवकरच सुरू होईल. यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होणार आहे. 

मतदारसंघांमध्ये झोपडपट्ट्यांचे प्रमाण अधिक आहे. शासनाने झोपडपट्टी पुनर्वसनासाठी नवी नियमावली तयार केली आहे. त्यामुळे आगामी काळात मतदारसंघातील तसेच संपूर्ण शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन हा प्रश्न मार्गी लागेल. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत प्रत्येकाला घर देण्यात येणार आहे. त्याची सुरुवातही झाली आहे. 

महापालिकेने हडपसर-मुंढवा या परिसरात या योजनेतंर्गत कामही सुरू केलेले आहे. आमच्या कामाच्या बळावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा राज्यात महायुतीचे शासन पुन्हा सत्तेवर येईल आणि पुण्यातील आठवी मतदारसंघात महायुतीचा  विजय होईल असा मला विश्वास आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news