संगीताची ‘खाण’ हरपली; संगीतकार नरेंद्र भिडेंची धक्कादायक ‘एक्झिट’

Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

हरिशचंद्राची फॅक्टरी, मुळशी पॅटर्न, देऊळबंद या चित्रपटांचे संगीतकार नरेंद्र भिडे यांचे आज (गुरुवार) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. (Musician Narendra Bhide) ते ४७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी आणि दोन मुले आहेत. (passes away)अंत्यदर्शन कर्वेनगर येथील डॉन स्टुडिओ येथे सकाळी ९:३० वाजता आणि सकाळी अकरा वाजता वैकुंठ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. 

अधिक वाचा : लस टोचून घ्यायला वाट पाहावी लागणार! कोणत्याच कोरोना लसीला तातडीने परवानगी नाही

सिव्हिल इंजिनियरची पदवी घेतलेल्या संगीतकार नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले आहेत. (upcoming Sarsenapati Hambirrao last film) त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद महंमद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे तर पाश्चिमात्य संगीताचे शिक्षण हेमंत गोडबोले यांच्याकडे घेतले. 

अधिक वाचा : दिल्लीत शेतकऱ्यांचा आक्रोश सुरु असतानाच पीएम मोदी आज नव्या संसद भवनाचे भूमिपुजन करणार

नरेंद्र भिडे यांनी  सरसेनापती हंबीरराव (आगामी), मुळशी पॅटर्न, रानभूल, त्या रात्री पाऊस होता, हिप हिप हुरे, पाऊलवाट , अनुमती, दिल ए नादान (बायोस्कोप), देऊळ बंद, कलम ३०२, साने गुरुजी,  शासन सिंहासन, चौदहवी का चाँद, आंधळी कोशिंबीर, आघात, शेवरी, रमा माधव, एलिझाबेथ एकादशी, यशवंतराव चव्हाण, हरिशचंद्राची फॅक्टरी,  मालक, मसाला, समुद्र, चाँद फिर निकला (हिन्दी) याशिवाय श्वास, सरीवर सरी, माती माय यासह अनेक चित्रपटांना पार्श्वसंगीत दिले.

अधिक वाचा : पंढरपूर : तब्बल ४० लाखांची सुपारी देऊन खुनाचा प्लॅन आखला आणि..

कोण म्हणत टक्का दिला?, माकडाच्या हाती शॅम्पेन, काटकोन त्रिकोण, चिरंजीव आईस, चांदणे शिंपीत जा, हमीदाबाईची कोठी, जोडी तुझी माझी, एक झुंज वाऱ्याशी, गोडी गुलाबी, फायनल ड्राफ्ट, लव्ह बर्डस , व्हाईट लिली अँड नाईट रायडर, अलीबाबा आणि ४० चोर, छापा काटा, आषाढातील एक दिवस, संगीत गर्वनिर्वाण….आदी नाटकांनाही त्यांच्या सुरेल संगीताचा साज चढला. 

अधिक वाचा : पाकमधून चीनला हिंदू, ख्रिश्‍चन मुलींची विक्री

तर  अवांतिका, ऊन पाऊस, साळसुद, घरकुल, मानो या ना मानो, पळसाला पाने पाच, भूमिका, पेशवाई, नूपुर, अबोली, श्रावण सरी, सुर – ताल, कॉमेडी डॉट कॉम, फुकट घेतला शाम, अमर प्रेम आदी मालिकांना त्यांनी संगीत दिले.  त्यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्सच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांना सह्याद्री सिने अवॉर्ड,  राज्य नाट्य पुरस्कार ( दोन वेळा), व्ही. शांताराम पुरस्कार, श्रीकांत ठाकरे पुरस्कार, राज्य चित्रपट पुरस्कार आदी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  नरेंद्र भिडे यांच्या जाण्याने मराठी संगीत क्षेत्रातील एक भक्कम पाया हरपल्याची भावना कलाकार व्यक्त करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news