पुणे : प्रतिनिधी
पुणे-बेंगलोर महामार्गावर कात्रज येथील नवीन बोगद्याजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील चारजण जागीच ठार झाले आहेत. मुलीला महाविद्यालयात सोडून परत गावी जाणाऱ्या कुंटुंबावर काळाने घाला घातला. ही दुर्दैवी घटना आज (सोमवार) पहाटे घडली.
यशवंत पांडुरंग माने (५६), पत्नी शारदा माने (४७), मुलगा ऋषीकेश माने (20) आणि चालक रामचंद्र सुर्वे (70) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. माने कुंटुंबिय मूळचे मुंबईचे आहे. त्यांची मुलगी शिक्षणासाठी पुण्यात आहे. तिला महाविद्यालयात सोडण्यासाठी माने कुटुंबिय रविवारी पुण्याला आले होते. तिला सोडून ते पहाटे परत निघाले असताना भरधाव ट्रक आणि त्यांच्या इंडिका कारचा भीषण आपघात झाला. त्यात चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
डॉ.यशवंत पांडूरंग माने हे मूळचे काळचौंडी ता. माण येथील रहिवासी आहेत. या अपघाताची बातमी माण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. काळचौंडी गावावर शोककळा पसरली आहे.