उस्‍मानाबाद : अल्‍पवयीन बेपत्‍ता मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश 

Published on
Updated on

उस्‍मानाबाद (कळंब) : पुढारी वृत्तसेवा 

तालुक्यातील डिकसळ येथील नऊ वर्षाची मुलगी ८ मे रोजी बेपता झाली होती. या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास कळंब पोलिसांना यश आले आहे. तालुक्यातील डिकसळ परिसरात एसटी कॉलनीत रहाणारी नऊ वर्षीय मुलगी भाग्यश्री कनगरे घरापुढे खेळत असताना बेपत्ता झाली. वडिलांनी पोलिसांना घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. पोलिसांनी मुलीच्या शोधासाठी तीन पथके निर्माण करून तातडीने मुलीचा शोध घेत तीला तीच्या आई वडिलांच्या ताब्‍यात दिले. 

या विषयी अधिक माहिती अशी की, तालुक्यातील डिकसळ परिसरातील एसटी कॉलनीत राहणारी भाग्यश्री कनगरे ही मुलगी घरापुढे खेळत होती. ती न सांगता निघून गेली होती. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कळंब पोलिस स्‍टेशन मध्ये रविवार (ता.९) दाखल झाली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक राजतीलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांनी मुलीच्या शोधासाठी तीन पथके तयार केली. पोलिसांनी तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. शिवाय जिथून मुलगी गायब झाली तेथील काही मजुरांची चौकशी करण्यात आली. तालुक्यातील इटकुर, वाकडी, कोठाळवाडी आदी भागात पोलिसांनी तपास केला. तालुक्यातील शिराढोन पोलिस ठाण्याच्या हद्दीत असाच प्रकार घडला होता,त्यामुळे येथील पोलिसांनी पथके निर्माण करून मुलीच्या शोधासाठी तत्काळ तपासाची चक्रे फिरविली.

प्रथम श्वान पथक रांबो च्या मदतीने बेपत्ता मुलीचा तपास सुरवतीला घरापासून करण्यात आला. शहरातील येरमळा रस्त्यावरील होळकर चौकापर्यत श्वान पथक थांबले.  त्यामुळे तपासात अडचणी आल्या. नंतर पोलिसांनी कळंब परिसरात वेगाने तपासाची चक्रे फिरविली.१० मे रोजी सहायक पोलिस निरीक्षक अतुल पाटील यांची टीम आंदोरा दिशेने तपास करण्यासाठी गेली असता, सदरील मुलगी तालुक्यातील अंदोरा येथील पुलाखाली झोपली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसानी तात्काळ शोध घेऊन मुलगी आई वडिलांच्या ताब्यात दिली. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. बेपत्ता मुलीचा तपास करून सुखरूप मुलगी आई वडिलांच्या ताब्यात दिल्याने पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिस निरीक्षक तानाजी दराडे, सहायक पोलिस निरीक्षक अतुल पाटील, अशोक पवार,पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत, शिवाजी सिरसाट, सुलीन कोळेकर, हंगे, मनोज दळवी, गणेश वाघमोडे, सादिक शेख, रवी कोरे, मिनाहज शेख, फरहनका पठाण, दिलीप व्हनडे, हबीब पठाण, शिवाजी राऊत आदींनी शोधकार्यात सहभाग घेतला. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news