वणी (नाशिक) : प्रतिनिधी
दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुरगाणा व कळवण या दोन्ही मतदारसंघातील शिवसेना भाजपा तसेच त्यांच्या मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची वणीत जाहीर सभा पार पडली. महायुतीचे दिंडोरी-पेठ विधानसभेचे उमेदवार भास्कर गावित, सुरगाणा-कळवण विधानसभेचे उमेदवार मोहन गांगुर्डे यांच्या प्रचारासाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता.
पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले की, सत्ता आल्यानंतर सुद्धा मी तुमचा आदर सत्कार राखणार हा शब्द देतो असे आश्वासन ठाकरे यांनी माजी आ.धनराज महाले व रामदास चारोस्कर यांना दिले. माझे पुर्वज धोडप किल्याचे रखवालदार होते. ते भगव्यासाठी लढले आणि आपण देखील भगव्यासाठी लढणार. काही लोक आमच्या बद्दल गैरसमज पसरवत आहेत, पण मी आपणास शब्द देतो की आदिवासींच्या हक्काला कणभर सुद्धा धक्का लागू देणार नाही.
तसेच वचननाम्यात दिल्याप्रमाणे १० रुपयात जेवणाचं ताट देणार, तसेच १ रुपयात विविध आरोग्य चाचण्या, शिक्षण, पिकविमा शेतकऱ्यांना पैसा मिळवून देण्यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला. द्राक्ष पीक नुकसानीसाठी चांगली योजना राबवणार, गेल्या पाच वर्षात शिवसेनेने सरकार अस्थीर होऊ दिलं नाही, वीज घरगुती ३०० युनीट वापर असणाऱ्यांसाठी ३०% दर कमी करणार.पुढच्या काळात शेतक-यांची कर्जमाफी हा मूळ मुद्दा नसून त्यांचा सातबारा कोरा करायचा आहे
स्थानिक मतदारसंघातील प्रश्नावर पाहिजे त्या प्रमाणात बोलले नाही वणी शहर मतदारसंघात मोठे गांव असून अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या ट्रामा केअर सेंटर बाबत कोणीच उल्लेख केला नाही. दिंडोरी सुरगाणा कळवण तालुक्यातील जनतेसाठी आरोग्याच्या बाबत मुळ प्रश्नावर बोलले गेले नाही
काँग्रेस भुई-सपाट झाली आहे, तर राष्ट्रवादी जमीनीखाली जाऊन शोधत आहे. एकटे शरद पवार साहेब ह्या वयात मेहनत करत आहेत. तसेच पवार साहेबांचा पाडा-पाडीचा अनुभव दांडगा आहे. पण, त्यांनी आता आमच्या नादी लागू नका यावेळी विक्रमी मताधीक्याने महायुतीचे सरकार येणार त्यासाठी तुमच्या मतदारसंघातून महायुतीच्या वतीने दिलेले उमेदवार विधान भवनात दिसले पाहिजे तुमचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझी आहे.
यावेळी खासदार संजय राऊत, खासदार भारती पवार, विनायक पांडे, जयंत दिंडे, महिला संपर्क प्रमुख स्नेहल मांडे, कारभारी आहेर, सुरेश डोखळे, आमदार धनराज महाले, रामदास चारोस्कर, दिलीप राऊत, केशरीनाथ पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सतिश देशमुख, भाजपा तालुका प्रमुख नरेंद्र जाधव, महेंद्र पारख, आरपीआय चे रत्नाकर पगारे, जि.प. सदस्या छाया गोतरणे, चंद्रकांत राजे, सुनिल पाटील, अॅड विलास निरगुडे, पांडुरंग गणोरे, मनोज घोंगे, राजेद्र गोतरणे, जगण सताळे, संदीप पवार आदींसह मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थीत होते