मुंबई : पुढारी वृत्तसेवा
भारतीय रेल्वे संघाकडून सलग ११ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेले महाराष्ट्राचे अमर राजाराम पवार यांचे दि. २ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७१ वर्षाचे होते. त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
वडील राजाराम पवार व काका शिवराम पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत अमरने अमर भारत या संघाकडून कबड्डीचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. महिंद्रा, एअर इंडिया या सारख्या कंपनीकडून कबड्डी खेळाडू म्हणून आलेली संधी सोडून त्यांनी काकांच्या मध्य रेल्वेत खेळाडू म्हणून पाऊल ठेवले. अशा या महान खेळाडूला ओम कबड्डी प्रबोधिनीने "कृतज्ञता पुरस्कार" देऊन गौरविले होते.