औरंगाबाद : हिवरखेडा दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना आमदार बोरनारेंची दोन लाखांची मदत

आमदार बोरनारे यांची दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांना भेट
आमदार बोरनारे यांची दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांना भेट

कन्नड पुढारी वृत्तसेवा : हिवरखेडा नांदगीरवाडी येथील वीज दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांची आज (दि.12) वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी नावडी गावात प्रत्यक्ष भेट घेतली. तसेच प्रत्येकी 50 हजार, असे एकूण दोन लाखांची मदत स्व खर्चातून दिली.

नावडी गावातील गणेश कारभारी थेटे (३५) भारत बाबुराव वरकड (३५) जगदीश मुरकुंडे( ४०) अर्जुन वाळु मगर (२६) हे हिवरखेडा नांदगीरवाडी येथे विजेची तार ओढण्याचे काम करत असताना तारेत वीज प्रवाह उतरून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची घटना (दि.8 जुलै) घडली होती.

आमदार बोरनारे यांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबांची भेट घेतली. त्यांना तात्काळ प्रत्येक कुटुंबाला ५० हजार रुपयांची, अशी एकूण दोन लाख रुपयांची मदत स्वतःच्या खिशातून दिली. तरुण वयात घरातील करता कुटुंब प्रमुख या दुर्घटनेत गेला असल्याने नावडी गावातील ही चार कुटुंब उघड्यावर पडली आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी तेथूनच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोबाईलवर संपर्क साधून सर्व घटनेची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्येक कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखाच्या मदतीची घोषणा करण्याचे आमदार बोरनारे यांना सांगितले.

यावेळी मोबाईलचा स्पीकर ऑन होता हा सर्व घटनाक्रम उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी पाहिला. यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुनील सोनवणे, रणजीत चव्हाण, संजय बोरनारे, सरपंच विलास जाधव, उपसरपंच निवृत्तीनाथ मुरकुंडे, बाबासाहेब मुरकुंडे, साहेबराव शिंगरे, प्रकाश मगर, सचिन थोरात, शैलेंद्र गांगुर्डे, चंदू अण्णा देशमुख, गणेश मुरकुंडे, सुरेश मगर, रामेश्वर आढाव, कल्याण भिडे, निलेश चव्हाण, नवनाथ राठोड व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी साधला सरपंचांशी संवाद

आमदार बोरनारे यांनी ग्रामस्थांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष सरपंचांशी देखील संवाद साधला. ही दुर्घटना घडायला नको होती. मात्र, दुर्दैवाने ती घडली असून सरकार आपल्या पाठीशी आहे. सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला न्याय देण्यात येईल. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येक कुटुंबाला पाच लाखाची मदत देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी दुर्घटनाग्रस्त कुटूंब व उपस्थित ग्रामस्थांना गहिवरून गेले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news