पुणे : आमदार बनसोडे यांच्या मुलावर तीन गुन्हे दाखल  

Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची  घटना बुधवारी (दि. १२) घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आमदार बनसोडे यांच्या मुलासह वीस जणांवर अपहरण करून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार पुत्रावर निगडी आणि पिंपरी येथे दोन गुन्हे दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.  

अधिक वाचा : पुणे : दौंडमध्ये आढळला अज्ञाताचा मृतदेह

सिद्धार्थ अण्णा बनसोडे, सावंतकुमार, लांडगे, सोन्या, साजिद, सुलतान (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) तसेच इतर १० ते १५ इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तानाजी भगवान पवार (वय ३९, रा. मोशी प्राधिकरण) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. १३) फिर्याद दिली आहे.

पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आमदार अण्णा बनसोडे आणि पवार यांचे फोनवर संभाषण झाले. त्यावेळी पवार आमदारांना उलटे बोलले, असा आरोपींचा समज झाला. या रागातून आरोपींनी अपासात संगनमत करून पवार यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचे अपहरण करून काळभोर नगर, चिंचवड येथे नेले. तेथे सिद्धार्थ बनसोडे याच्यासह इतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी, चामडी पट्ट्याने, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच, सिद्धार्थ बनसोडे याने लोखंडी चॉपरने डोक्यात मारून ठार माण्याचा प्रयत्न केला. 

अधिक वाचा : पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

तर सावनकुमार रमेश सलादल्लू (वय ४८, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तानाजी भगवान पवार (वय ३९, रा. मोशी प्राधिकरण, मूळ रा. उंबरडे, पो. गुरसाळे, ता. खटाव), संकेत शशिकांत जगताप व श्रीनिवास बिरादार (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपी तानाजी पवार यांच्या ॲन्थोनी कंपनीला पिंपरी-चिंचवड महापालिके कचरा उचलण्याचे काम मिळालेले असून, त्यामध्ये स्थानिक तरुणांना प्राधान्य द्यावे यासाठी आमदार अण्णा दादू बनसोडे यांनी आरोपी पवार याला चर्चेसाठी बोलावले. त्यानुसार अण्णा बनसोडे यांच्या काळभोर नगर, चिंचवड येथील कार्यालयात बुधवारी (दि. १२) दुपारी दोनच्या सुमारास पवार साथीदारांना घेऊन आला. त्यावेळी त्याने चर्चेदरम्यान आमदारांना शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली. तसेच, आमदार बनसोडे व त्यांचा मुलगा सिद्धार्थ यांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दिशेने पिस्तूलातून गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

अधिक वाचा : को-२६५ उसाची नोंद घ्या! अन्यथा गाळप परवाना नाही; साखर आयुक्तालयाचा इशारा 

निगडीतील घटनेत स्वाती सचिन कदम (३९, रा. गंगानगर, फुरसुंगी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. १२) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सिद्धार्थ बनसोडे आणि अण्णा बनसोडे यांचे पीए व इतर आठ इसम (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आकुर्डी येथील एजी एनव्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लि. या कंपनीत नोकरीला आहेत.

दरम्यान, आरोपी मंगळवारी (दि. ११) दुपारी साडेबाराच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या ऑफिसवर आले. त्यांनी कंपनीच्या पॅन्ट्रीमध्ये जबरदस्तीनू घुसून धनराज बोडसे व अमोल कुचेकर यांना मारहाण केली. तसेच, कार्यालयाबाहेर जमाव केला. कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत, अशी विचारणा आरोपींनी केली. तानाजी पवार हे कोठे आहेत, हे आम्हाला माहीत नाही, असे आरोपींना सांगितले असता त्यांनी फिर्यादीच्या कंपनीचे आयटी एक्झीक्यूटीव विनोद रेड्डी यांना डोक्यावर घातक शस्त्राने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, कामगार गोकर्ण चव्हण यांना ढकलून देऊन जखमी केले. त्यानंतर ऑफिस जबरदस्तीने बंद करण्यास सांगून फिर्यादी व तानाजी पवार यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. गोळीबार प्रकरणाशी संबंधित पिंपरीत परस्पर विरोधी आणि निगडी पोलिस ठाण्यात एक असे एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news