लूटमार करणार्‍या टोळीला ‘मोका’ | पुढारी

Published on

सातारा : पुढारी वृत्तसेवा

तीन जिल्ह्यांच्या महामार्गासह जोड रस्त्यावर निर्जनस्थळी गाठून नागरिकांना लूटणार्‍या पाच जणांच्या टोळीला पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी 'मोका' (संघटित गुन्हेगारी) अंतर्गत कारवाई केली. संशयित सर्व आरोपी बारामती (जि. पुणे) व फलटण (जि. सातारा) येथील आहेत. सर्व संशयित रेकॉर्डवरील असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

महेश जयराम जगदाळे (वय 27), ऋत्विक ऊर्फ बंटी देवानंद लोंढे (19, दोघे रा. कांबळेश्वर), संकेत सुनील जाधव (24, रा. कल्पनानगर, तांदूळवाडी सर्व ता. बारामती), राजू ऊर्फ राज राम बोके (34, मंगळवार पेठ), दिलीप राजाराम खुडे (32, रा. लक्ष्मीनगर दोघे फलटण, जि.सातारा) यांच्यावर 'मोका' अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, ही टोळी सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्याच्या महामार्गावर तसेच जोड रस्त्यावर लूटमार करायचे. निर्जनस्थळी जात असलेल्या नागरिकांना थांबवून त्यांच्याकडील सोने, पैसे, मौल्यवान वस्तू जबरदस्तीने चोरायचे. संशयितांच्या या कृत्यांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. अशातच दि. 16 मे रोजी बाणगंगा परिसरात दोघांना लुटून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, गाडी यासह इतर वस्तू असा 5 लाख 16 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

या घटनेनंतर तक्रारदार यांनी फलटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासामध्ये तिघांनी हे कृत्य केल्याचे समोर आले. संशयितांचे पोलिसांनी रेकॉर्ड तपासले असता महेश जगदाळे याच्यावर 7, बंटी लोेंढे याच्यावर 1, संकेत जाधव याच्यावर 4, राजू बोके याच्यावर 13 तर दिलीप खुडे याच्यावर 2 गुन्हे दाखल असल्याचे रेकॉर्ड समोर आले.

संशयित टोळी हत्याराचा धाक दाखवून रॉबरी, दरोड्यासह इतर गुन्हे करत असल्याचे समोर आल्याने त्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. तो प्रस्ताव सातारा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून कोल्हापूर परिक्षेत्राकडे पाठवल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली. त्यानुसार सातारा पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन संशयितांना अटक केली. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी तानाजी बरडे, पोनि बी. केे. किंद्रे, पोनि किशोर धुमाळ, फौजदार ए. ए. कदम, पोलिस हवालदार प्रवीण शिंदे, अमित सपकाळ, शरद तांबे या सातारा पोलिस दलातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी कारवाईत सहभाग घेतला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news